नोकरीचे आमिष : बेरोजगारांना १२ लाखांना गंडा

By Admin | Updated: February 20, 2017 20:04 IST2017-02-20T20:04:43+5:302017-02-20T20:04:43+5:30

मंत्रालयामधील ओळख सांगत एलआयसी व एमएसव्हीई कार्पोरेशनमध्ये नोकरीचे आमिष

Job lure: 12 lakhs for unemployed | नोकरीचे आमिष : बेरोजगारांना १२ लाखांना गंडा

नोकरीचे आमिष : बेरोजगारांना १२ लाखांना गंडा



नाशिक :
मंत्रालयामधील ओळख सांगत एलआयसी व एमएसव्हीई कार्पोरेशनमध्ये नोकरीचे आमिष दाखवून अमरावती येथील अभिजीत ग. काळमेघ (३२ रा.योगीराज कॉलनी, अमरावती) याने बेरोजगारांना बारा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

प्रदीपसिंग उत्तमसिंग ओनावळे (थर्मल पॉवर स्टेशन, सामनगाव, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०१५ मध्ये त्यांची पुतणी व इतर बेरोजगारांशी काळमेघची भेट झाली़ त्याने मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून एलआयसी तसेच एमएसव्ही कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले़ त्यानुसार या बेरोजगारांनी त्यास नोकरीसाठी १२ लाख रुपये दिले़ मात्र सांगितलेला कालावधी उलटूनही नोकरी न मिळाल्याने तसेच दिलेले पैसेही परत मिळत नसल्याने ओनावळे यांनी न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता़
या दाव्यावर न्यायालयामध्ये नुकतीच सुनावणी पूर्ण होऊन संशयित काळमेघ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते़ त्यानुसार नाशिकरोड पोलिसानी संशयित अभिजित काळमेघविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, यामध्ये अनेक बेरोजगार तसेच फसवणुकीच्या तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे़

Web Title: Job lure: 12 lakhs for unemployed