जिंकलस भावा...  भंगार अन् रद्दी विकणाऱ्या बापाचा लेक बनला 'नायब तहसिलदार'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 03:07 PM2020-06-21T15:07:08+5:302020-06-21T15:15:29+5:30

अक्षयचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून गावोगावी सायकलने फिरून भंगार खेरेदी करतात आणि त्याबदलात रांगोळी विकण्याचा व्यवसाय करतात.

Jinkalus bhava ... Deputy Tehsildar became the lake of father who sells scrap in amravti tiwasa | जिंकलस भावा...  भंगार अन् रद्दी विकणाऱ्या बापाचा लेक बनला 'नायब तहसिलदार'

जिंकलस भावा...  भंगार अन् रद्दी विकणाऱ्या बापाचा लेक बनला 'नायब तहसिलदार'

Next

मुंबई - अमरावती तालक्याच्या तिवसा येथील एका युवकाने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलयं. नुकताच राज्यसेवा परीक्षांचा निकाल जाहीर झाला, त्यामध्ये ग्रामीण भागातील तरुणांनी मोठी भरारी घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र, तिवस्यातील अक्षयचा जिद्दीची अन् यशाची कथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. घरात अठरा विश्व दारिद्र असतानाही, अक्षयने परिस्थितीवर मात करत नायब तहसिलदार पदाला गवसणी घातली. अक्षयच्या या यशस्वीतेमुळे जिल्ह्यात त्याचे आणि त्याच्या आई-वडिलांचे कौतुक होत आहे. 

अक्षयचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून गावोगावी सायकलने फिरून भंगार खेरेदी करतात आणि त्याबदलात रांगोळी विकण्याचा व्यवसाय करतात. मात्र, आपल्या नशिबी जे कष्ट आणि पीडा आली ती मुलाच्या येऊ नये, या भावनेतून त्यांनी मुलगा अक्षयला शिक्षण देण्यासाठी अपार कष्ट घेतले. आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेऊन अक्षयनेही मोठ्या जिद्दीने राज्यसेवा परीक्षेतून विजयश्री खेचून आणली. अक्षय गडलिंग हा तिवसा शहरात राहतो. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्याने भविष्यात त्याने मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी त्याने प्रयत्नांची परिकाष्ठा केली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अक्षय महागडे शिकवणी वर्ग लावू शकत नव्हता. त्यामुळे त्याने विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शिकवणी वर्गात प्रवेश घेतला. त्याने दिल्ली येथील शिकवणी वर्गात तसेच तिवस्यातील राजश्री शाहू महाराज वाचनालयात तासनतास बसून अभ्यासाचे धडे गिरवले. गेल्यावेळी तहसीलदार पदासाठी तीन गुणांनी नापास झालेला अक्षय खचून न जाता पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागला आणि त्याने यश मिळविले.

अक्षय त्याला मिळालेल्या या यशाचे सर्व श्रेय आईवडिलांना, मित्रांना आणि शिक्षकांना देतो. अक्षयचे 'माझे बाबा हे ९ वी वर्ग पास तर आई ४ थी शिकलेली आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने वडील भंगार, रद्दी गोळा करण्याचा व्यवसाय करताना तर आई मोलमजुरी करते. असे असूनही त्यांनी गरिबीची झळ मला कधीच पोहचू दिली नाही. त्यामुळे, माझे हे यश माझ्यापेक्षा माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचं पांग फेडणारं आहे. मी सरकारच्या सर्व योजनांचा फायदा माझ्या अभ्यासासाठी घेतल्याचेही अक्षयने सांगितले. आई-वडिलांनी दिलेलं पाठबळ, मित्र व शिक्षकांची साथ आणि सरकारी योजनांचा फायदा घेऊन मी स्वत:ला अभ्यासात झोकून दिलं. उपजिल्हाधिरी आणि तहसिलदार पदाची पोस्ट अतिशय कमी मार्काने मी हुकलो. पण, नायब तहसिलदार हेही नसे थोडके असे म्हणत आई-वडिलांनी मला समजावून सांगत धीर दिला, असेही अक्षय म्हणाला.  

सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले आशिष बोरकर हे तिवसा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना ते राज्यसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या मुलांचे मोफत शिकवणी वर्ग घ्यायचे. त्यातून अक्षयची त्यांच्याशी भेट झाली. अक्षयची अभ्यासाविषयीची तळमळ बघून आशिष बोरकर यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्याला अनेक महागडी पुस्तके उपलब्ध करून दिली. तसेच वेळप्रसंगी आर्थिक मदत केली. अक्षयच्या या यशाचा त्यांना मोठा आनंद झाला असून त्यांनी त्याचे कौतुक केले आहे. 

Web Title: Jinkalus bhava ... Deputy Tehsildar became the lake of father who sells scrap in amravti tiwasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.