पथ्रोट परिसरात झोलाछाप डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:42+5:302021-02-05T05:22:42+5:30

फोटो पी ०१ पथ्रोट फोल्डर वागडोह येथे थाटला दवाखाना, आरोग्य विभागाकडून पाठराखण पथ्रोट : पथ्रोट व परिसरातील आदिवासीबहुल भागातील ...

Jholachap doctor in Pathrot area | पथ्रोट परिसरात झोलाछाप डॉक्टर

पथ्रोट परिसरात झोलाछाप डॉक्टर

फोटो पी ०१ पथ्रोट फोल्डर

वागडोह येथे थाटला दवाखाना, आरोग्य विभागाकडून पाठराखण

पथ्रोट : पथ्रोट व परिसरातील आदिवासीबहुल भागातील खेड्यात चार तथाकथित डॉक्टरांनी १५ वर्षांपासून बस्तान मांडले असून, परिसरातील भोळ्याभाबड्या आदिवासींची लूट चालविली आहे. याबाबत आरोग्य विभागाकडे परिसरातील नागरिकांनी तक्रार करूनही आरोग्य विभाग मूग गिळून आहेत.

पथ्रोट येथील वॉर्ड क्रमांक २ तेलंगखडी येथे राहणाऱ्या भोला राय नामक व्यक्तीने वैद्यकीय व्यवसायाचे रजिस्ट्रेशन नसताना व वैध पदवी नसताना चक्क आरोग्य विभागाच्या नाकावर टिच्चून वागडोह (शहानूर) येथील आदिवासी खेड्यात दवाखाना थाटला आहे. कुडामातीच्या छोट्याशा खोलीत १५ वर्षांपासून त्याचा हा गोरखधंदा सुरू आहे. प्रत्येकी एका सलाईनसाठी ७०० ते ८०० रुपये दर घेऊन त्या तोतया डॉक्टरने रुग्णांची लूट चालविली आहे. तोतया डॉक्टर भोला रायने आदिवासी भागातील जनुना, पायविहीर, चौºयामल, मोरगढ, कुणबी, वाघोली, गोंडवाघोली, सोनापूर खेड्यात दुचाकीने जाऊन ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे.

याबाबत दोन महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, आरोग्य विभागाच्या गठित केलेल्या समितीतर्फे चौकशी करून परिसरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अजूनपर्यंत आरोग्य विभागाकडून कारवाई झालेली नाही. त्यामुळे या बोगस डॉक्टरचा व्यवसाय जोरात सुरु आहे. आरोग्य विभागाचा त्याच्यावर वरदहस्त असल्याची जनचर्चा आहे.

कोट १

आरोग्य विभागाने झोलाछाप बोगस डॉक्टरांची चौकशी करावी व त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी. मात्र, या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे.

- वामन शिराळकर, नागरिक, वागडोह

कोट

पथ्रोट येथील तेलंगखडी येथे बस्तान मांडलेल्या बोगस डॉक्टरकडून रूग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. ग्रामपंचायतने तक्रार करून आरोग्य विभागाकडून कार्यवाही करवून घ्यावी.

- नितीन देव्हारे, नागरिक, तेलंगखडी.

———————————-

Web Title: Jholachap doctor in Pathrot area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.