आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्य व राष्ट्रीय स्तरावर शूटिंग खेळात भरीव कामगिरी करणारी तथा स्थानिक रहिवासी जेसिका उमाठे हिला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते रायफल प्रदान करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने नावीन्यपूर्ण योजनेतून १ लाख ६० हजार रुपयाची रायफल देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.जेसिका हिचा शुटींगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याचा मानस आहे. मात्र, तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ती शूटिंगच्या सरावासाठी रायफल खरेदी करू शकत नाही. ही बाब जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या लक्षात आली. त्यांनी जेसिका हिच्या खेळाडू वृत्तीला प्रतिसाद देण्यासाठी रायफल उपलब्ध करून दिली. जिल्हाधिकारी बांगर यांनी जेसिका हिच्या पुढील कामगिरीस भरभरून शुभेच्छा दिल्यात.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जेसिकाला रायफल प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:31 IST
राज्य व राष्ट्रीय स्तरावर शूटिंग खेळात भरीव कामगिरी करणारी तथा स्थानिक रहिवासी जेसिका उमाठे हिला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते रायफल प्रदान करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जेसिकाला रायफल प्रदान
ठळक मुद्देनावीन्यपूर्ण योजना : जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा पुढाकार