परतवाड्यात जीपगाडीने उडविला थरकाप

By Admin | Updated: April 27, 2016 00:08 IST2016-04-27T00:08:52+5:302016-04-27T00:08:52+5:30

सोमवारी सायंकाळी ६ वाजता वेगाने जीप चालवित सुटलेल्या चालकाने लाल पुलाजवळ दुचाकीस्वारांना धडक देऊन जखमी केले.

The jeep paddles in the backyard | परतवाड्यात जीपगाडीने उडविला थरकाप

परतवाड्यात जीपगाडीने उडविला थरकाप

दोघे गंभीर : ‘मोनी’च्या समयसुचकतेने पूर्णानगरजवळ जाळ्यात अडकला
परतवाडा : सोमवारी सायंकाळी ६ वाजता वेगाने जीप चालवित सुटलेल्या चालकाने लाल पुलाजवळ दुचाकीस्वारांना धडक देऊन जखमी केले. अपघात होताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोनी इर्शिद या युवकाच्या समयसुचकतेने त्याला आसेगाव पोलिसांनी पूर्णानगरजवळ पाठलाग करून अडविण्यात यश मिळविले.
परतवाडा शहरात मागील पंधरा दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरू आहे. अश्यातच सोमवारी सायंकाळी ६ वाजता लालपूल येथील भुलभुलय्या पॉर्इंटनजीक पांढऱ्या रंगाच्या बोलेरो क्रमांक एमएच ४५ ए. ७७४७ ने परतवाडा येथून अमरावतीकडे जाणाऱ्या एमएच २७ ए. व्ही. १९४५ या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात विजय कारसरटे (३०) व प्रफुल्ल उर्फ विक्की बाबाराव भलावी (२०) गंभीर जखमी झाले. त्यांना धडक दिल्यावर वाहन चालकाने तेथून भरधाव वेगाने पळ काढला. परंतु गाडी घेवून चालकाने पोबारा केला होता. याचीही माहिती आसेगाव पोलिसांना देण्यात आल्याने त्या मस्तीखोर चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. (प्रतिनिधी)

जीवाचा थरकाप उडविणारा प्रसंग
अपघात करून लालपूल, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, बसस्थानकापर्यंत बोलेरोचा चालक राजेंद्र रामचंद्र देवकर (रा. मालेगाव, जि. सोलापूर) याने भरधाव वाहन पळविले. यात अनेकांच्या अंगावर जाण्यासोबत बसस्थानकानजीक रस्ता दुभाजीकरणाला धडक दिली. उपस्थित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. मात्र डोळ्याची पापणी लवण्याच्या आतच तो बेपत्ता झाला.

आणि मोनी निघाला भरधाव
लालपुलाजवळ अपघातच होताच त्याचा आवाज परिसरात पोहोचला. तेथे आपल्या कार्यालयात बसलेला ‘मोनी इर्शिद’ या कार्यकर्त्याने घटनास्थळी जखमींना उचलण्यासाठी धाव घेतली. क्षणात समयसुचकतेचा परिचय देत मोनी या युवकाने सहकाऱ्यांना जखमी युवकाकडे पाठवून स्वत:च्या दुचाकीने चारचाकी वाहनाचा पाठलाग केला. तो थेट सहा किमी अंतरावरील चांदूरबाजार नाक्यापर्यंत स्वत:चा दोन वेळा अपघात होता होता थोडक्यात बचावला. आपल्या मोबाईलमध्ये त्या भरधाव पळणाऱ्या वाहनाचे व्हीडीओ चित्रीकरण केले आणि आसेगाव पोलीस व परतवाडा पोलिसांना माहिती दिली. पिंटू भुजबळ या युवकाने जखमींना दवाखान्यात नेले.

आसेगाव पोलिसांच्या वाहनाला धडक
अपघात करून पळण्याच्या स्पर्धेत पांढऱ्या बोलेरोचा क्रमांक दूरध्वनीवर आसेगाव पोलिसांना देण्यात आला. पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र त्यांनाही हुलकावणी देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर पुढे बोलेरो मागे आसेगाव पोलिसांची गाडी असा खेळ पूर्णानगरपर्यंत चालला आणि पोलिसांच्या गाडीला धडक देताच बोलेरोची गती थांबली. आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Web Title: The jeep paddles in the backyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.