जयस्तंभ चौक अतिक्रमणात..!

By Admin | Updated: May 13, 2016 00:14 IST2016-05-13T00:14:35+5:302016-05-13T00:14:35+5:30

स्थानिक जयस्तंभ चौक, सिनेमा चौक या परिसरात किरकोळ विक्रेत्यांनी तसेच व्यावसायिकांनी जयस्तंभ चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण थाटण्यास सुरुवात केलेली आहे.

Jayasthambha square encroachment ..! | जयस्तंभ चौक अतिक्रमणात..!

जयस्तंभ चौक अतिक्रमणात..!

किरकोळ विक्रेते, व्यावसायिकांचा हस्तक्षेप : अपघातास जबाबदार कोण?
दर्यापूर : स्थानिक जयस्तंभ चौक, सिनेमा चौक या परिसरात किरकोळ विक्रेत्यांनी तसेच व्यावसायिकांनी जयस्तंभ चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण थाटण्यास सुरुवात केलेली आहे. हा रास्ता अतिक्रमणामुळे अत्यंत गजबजून गेला आहे. रस्त्यावरून दोन चाकी वाहन काढायलासुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जयस्तंभ चौक, सिनेमा चौकातील अतिक्रमण काढून नगरपालिकेने हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या रस्त्यावर खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक भर रस्त्यावर आपले वाहन उभे करून ठेवत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. या चौकात दुभाजक बांधण्यात आलेले आहेत. काही हौशींनी तर या दुभाजकावरच आपले व्यवसाय करण्यास सुरुवात केलेली आहे. काहींनी तर पुढे दुभाजकालाच आपले ट्रॅक्टर, फोर व्हिलर लावून ठेवलेले आहेत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत चाचली आहे.
या ठिकाणी फेरफटका मारला असता येथे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले आहे. परंतु अतिक्रमण निर्मूलन पथक पूर्णत: निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. खरे तर येथे कारवाईचा बडगा उगारणे अपेक्षित आहे. पण संबंधित अधिकारी येथे कारवाई का करीत नाही, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)

त्या हात व्यावसायिकांवर कारवाई का नाही ?
सर्व नियमांची पायमल्ली करुन इथे बेशिस्तपणे भर राहदारीच्या रस्त्यावर व्यवसायिकांनी आपआपली दुकाने रस्त्यावर थाटली आहे. तसेच वाहने सुद्धा उभी केलेली आहे. जयस्तंभ चौक, सिनेमा चौक येथे मोठ्या प्रमाणात रस्ता अतिक्रमणामुळे गायब झालेला आहे. परंतु या व्यावसायिकांवर कारवाई का होत नाही, असा सवाल निर्माण होत आहे.

वाहतूक पोलिसांकडून कारवार्ईची अपेक्षा
शहरातील अनेक नागरिक खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येतात. त्यांची वाहने इथे बेकायदेशीरपणे उभी करुन ठेवतात. त्यामुळे रस्त्याचा काही भाग वाहनांनी व्यापलेला असतो, तर काही भाग दुकानांनी अतिक्रमित केलेला आहे. यामुळे रस्ता पूर्णपणे बंद होतो. येथे अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे अक्ष्यम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Jayasthambha square encroachment ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.