शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

जवाहर गेट रोडवर तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:32 PM

जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास जवाहर गेट रोडवर घडली.

ठळक मुद्देसात अटकेत : नातेवाइकांसह नागरिकांचा खोलापुरी गेट ठाण्यात ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास जवाहर गेट रोडवर घडली.योगेश ऊर्फ गुड्डू वासुदेव हरणे (२४, रा. महाजनपुरा) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात खोलापुरी गेट पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. घटनेला कारणीभूत असणाऱ्या अन्य चार तरुणांनाही अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाइकांसह नागरिकांनी शुक्रवारी सकाळी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्याने खळबळ उडाली होती.पोलीस सूत्रानुसार, कृष्णा दिलीप लोखंडे (१९), आकाश दिलीप लोखंडे (२२), वैभव ऊर्फ बंडू सुभाष तायडे (१९), मनोज सुभाष तायडे (२२) व संकेत महेंद्र खडसे (१९), (सर्व रा. माताखिडकी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणात सुरेश स्वर्गे व प्रभाकर वाळसे यांनाही शुक्रवारी दुपारी अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.मृत योगेश हरणेचा मित्र महेश सुभाष वाटकर (२४, रा. आनंदनगर) याच्या तक्रारीनुसार, योगेश व महेश हे दोघे एका दुचाकीने, तर दुसºया दुचाकीवर योगेशचा भाऊ शिवा गुरुवारी रात्री बिर्याणी आणण्यासाठी इतवारा बाजारातील हॉटेलमध्ये गेले होते. बिर्याणी न घेता तिघेही परत घरी जात असताना जवाहर रोडवर कृष्णा लोखंडे याने योगेशला आवाज देऊन थांबविले. तुम्हाला माज चढला, थांबा तुम्हाला दाखवितो, असे म्हणत त्याने अन्य साथीदारांना बोलावून घेतले. आरोपींनी लाथेने दुचाकी पाडल्या आणि तिघांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. यादरम्यान मनोज तायडे याने चाकू काढून योगेशच्या पायावर मारल्याचे फिर्यादी महेश वाटकर याने तक्रारीत नमूद केले आहे.ठाण्यासमोर टाकलेयोगेशने हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तेथून पळ काढून घर गाठले. त्यानंतर काही नागरिकांनी योगेशला पोलीस ठाण्यासमोर आणून टाकले. खोलापुरी गेट पोलिसांनी रक्तबंबाळ अवस्थेतील योगेशला तात्काळ इर्विन रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला. पोलिसांनी महेशच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भांदविचे कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ४/२५ आर्म अ‍ॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्याची कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविला आहेखोलापुरी गेट ठाण्यात पोहोचले शेकडो नागरीकयोगेश हरणेला बुधवारी सकाळी चार तरुणांनी रस्त्यात अडवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. ही बाब योगेशच्या आईसमोरच घडली. त्या चार तरुणांनीच आरोपींना शह दिल्यामुळे योगेशची हत्या झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्या चार तरुणांनीही अटक करा, अशी मागणी घेऊन मृताच्या नातेवाइकांसह शेकडो नागरिकांनी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. आरोपींना अटक करा, अन्यथा मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतल्याने खळबळ उडाली होती. तणावाची स्थिती निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेत पोलिसांनी मृताच्या नातेवाइकांची समजूत घातली. चौकशीनंतर त्या आरोपींनाही अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर प्रकरण शांत झाले.जिवाच्या आकांताने तो पळत सुटला घरीगजबजलेल्या जवाहर रोडवर आरोपींनी योगेशवर चाकूने प्राणघातक हल्ला चढविला. चाकू उजव्या मांडीत शिरल्याने रक्ताची धार लागली होती. आरोपी पुन्हा हल्ला करतील, या भीतीने योगेशने त्याच अवस्थेत तेथून पळ काढला. जवाहर रोडवरून धावत जात असताना तो सराफा चौकात कोसळला. त्याने स्वत:ला कसेबसे सावरले आणि घराच्या दिशेने धाव घेतली. जिवाच्या आकांताने तो पळत असताना नागरिक बघ्याच्या भूमिकेत होते.जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. मात्र, जुने भांडण निश्चित काय होते, हे चौकशीत पुढे येईल. या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे.- शशिकांत सातवपोलीस उपायुक्त