जत्राडोह...
By Admin | Updated: August 25, 2015 00:23 IST2015-08-25T00:23:24+5:302015-08-25T00:23:24+5:30
मेळघाट म्हणजे घाटांचा मेळ. दऱ्या-खोऱ्यांचा संगम. नैसर्गिक मनोहारी धबधब्यांची आरास. रविवारी विदर्भातील या नंदनवनात पर्यटकांचा जणू सागरच उसळतो.

जत्राडोह...
मेळघाट म्हणजे घाटांचा मेळ. दऱ्या-खोऱ्यांचा संगम. नैसर्गिक मनोहारी धबधब्यांची आरास. रविवारी विदर्भातील या नंदनवनात पर्यटकांचा जणू सागरच उसळतो. चिखलदरानजीकच्या या 'जत्राडोहा'तही हौशी पर्यटकांची तोबा गर्दी उसळते. २५ फूट उंचीवरून कोसळणाऱ्या धबधब्यामुळे निर्माण झालेल्या खोल डोहात पर्यटक मुले उड्या घेतात. हा आनंद लुटताना पाण्याखाली लपलेल्या धोक्यांची जाणीव मात्र त्यांना नसते. छुपे धोके लक्षात आणून देणारी फलके शासनाने अशा ठिकाणी लावलीत तर मौजमजेसह सतर्कताही बाळगता येईल.