शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीत महापालिकेची ‘स्वच्छ’ परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:53 IST

देशातील ४,०४१ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जानेवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला सामोरे जात आहेत. ४ हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी पूर्वतयारीने वेग घेतला आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१८ : पूर्वतयारीला वेग; स्वच्छतागृह उभारणीवर भर

आॅनलाईन लोकमतअमरावती : देशातील ४,०४१ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जानेवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला सामोरे जात आहेत. ४ हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी पूर्वतयारीने वेग घेतला आहे. शहरात स्वच्छतेच्या मुद्द्यावर अहमहमिका लागली आहे. अमरावती महापालिकेने त्यासाठी मराठी अभिनेता भारत गणेशपुरे यांना ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर नेमून लोकसहभागाला साद घातली आहे.सन २०१७ च्या जानेवारीत झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात अमरावती तब्बल २३१ व्या क्रमांकावर पिछाडल्याने यंदा ती नामुष्की टाळण्यासाठी प्रशासन व पदाधिकारी हातात हात घालून कामाला लागले आहेत.४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत देशभरातील ४,०४१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले आहे. केंद्राच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या अखत्यारितील काऊंन्सिल आॅफ इंडियाचे पथक शहरा-शहरांत स्वच्छतेचे सर्वेक्षण करणार आहे. स्वच्छताविषयक ७१ बाबींवर हे स्वच्छ सर्वेक्षण होणार असून, राज्य आणि विभागीय स्तरावर शहरांचे गुणाांकन केले जाईल. २०१८ मध्ये होणारे हे तिसरे स्वच्छ सर्वेक्षण आहे. यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात ४३४ शहरांनी सहभाग घेतला. ही परीक्षा दोन हजार गुणांची होती. स्वच्छतेच्या माध्यमातून गरिबी व आरोग्याच्या प्रश्न समस्येवर मात करण्यासाठी केंद्राने हा महत्त्वाकांक्षी प्रयोग हाती घेतला आहे.देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतागृह पुरविण्यासह घनकचरा व्यवस्थापन, विलगीकरण, प्रक्रिया आणि कचरा संकलन हे घटक स्वच्छ सर्वेक्षणात अंतर्भूत आहेत. संपूर्ण शहर हगणदरीमुक्त करून घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविणाºया शहरांना पुरस्कारार्थ प्रोत्साहन निधी देऊन गौरविण्यात येईल. त्यादृष्टीने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत प्रशासन कामाला लागले आहेत. वैयक्तिक शौचालयांसह सार्वजनिक, सामुदायिक स्वच्छतागृहांची उभारणी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा विलगीकरण आणि स्वच्छतेसाठी अ‍ॅप कार्यान्वित करण्यासोबतच स्वच्छतेविषयक मोहीम, अभियान व जनजागृती हाती घेण्यात आली आहे.नागरिकांच्या प्रतिक्रिया १४०० गुणांच्याजानेवारी-फेब्रुवारी २०१८ मध्ये होऊ घातलेल्या चार हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. नागरी स्थानिक संस्थांनी स्वच्छतेविषयक कसे कामकाज केले, त्याबाबतच्या प्रतिक्रियांवर १४०० गुण अवलंबून आहेत. याशिवाय प्रत्यक्ष निरीक्षणाला १२०० गुण, तर स्वच्छतेविषयक सेवास्तरावरील प्रगतीसाठी १४०० गुण आहेत.जानेवारी २०१८ मध्ये तिसरे स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले आहे. या चार हजार गुणांच्या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी महापालिकेने पूर्वतयारीला वेग दिला आहे.- हेमंतकुमार पवार,आयुक्त, महापालिका