आरटीई प्रवेश शाळा नोंदणीसाठी ३० जानेवारीची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:27+5:302021-02-05T05:26:27+5:30

अमरावती : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई (शिक्षण हक्क कायदा) प्रवेशाचे वेळापत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. ...

January 30 deadline for RTE admission school registration | आरटीई प्रवेश शाळा नोंदणीसाठी ३० जानेवारीची डेडलाईन

आरटीई प्रवेश शाळा नोंदणीसाठी ३० जानेवारीची डेडलाईन

अमरावती : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई (शिक्षण हक्क कायदा) प्रवेशाचे वेळापत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. त्यानुसार आरटीई प्रवेशासाठी पात्र शाळांना येत्या ३० जानेवारीपर्यंत नोंदणी बंधनकारक आहे. ९ फेब्रुवारीपासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

गतवर्षाप्रमाणे यंदाही एकच लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर शाळेची अधिक त्या जागेच्या संख्या तितकीच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाणार असून, रिक्त जागा भरल्या जातील. प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्यावरही शाळेत जागा रिक्त व अर्ज शिल्लक असल्यास पुन्हा सोडत काढून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची चार टप्प्यांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरटीई प्रवेशासाठी ९ ते २६ फेब्रुवारी दरम्यान अर्ज करण्याची संधी पालकांना मिळणार आहे . ५ मार्चला जागांची लॉटरी निघेल लॉटरीत निवड झालेल्या पालकांना ९ ते २६ मार्च या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीचा पहिला टप्पा २७ मार्च ते ६ एप्रिल, दुसरा टप्पा १२ ते १९ एप्रिल, तिसरा टप्पा २६ एप्रिल ते ३ मे, तर चौथा टप्पा १० ते १५ मे या कालावधीत पार पडणार आहे.

बॉक्स

अशी राहणार प्रवेश प्रक्रिया

३० जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीची मुदत

९ ते २६ फेब्रुवारी प्रवेश अर्ज भरणे

५ ते ६ मार्च ऑनलाईन सोडत

९ ते २६ मार्च प्रवेश निश्चिती

कोट

शैक्षणिक सत्र २०२१-२२ करिता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार याबाबतची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून दिलेल्या सूचनेप्रमाणे राबविली जाईल.

- एजाज खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Web Title: January 30 deadline for RTE admission school registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.