‘जाणता राजा’ महानाट्याची लक्ष्मी झाली ४७ वर्षांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 00:26 IST2016-10-06T00:26:19+5:302016-10-06T00:26:19+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवंत जीवनपट सादर करणाऱ्या ‘जाणता राजा’ या लोकप्रिय महानाट्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारी...

‘जाणता राजा’ महानाट्याची लक्ष्मी झाली ४७ वर्षांची
२० वर्षांपूर्वी दाखल : चिमुकल्यांचे आकर्षण
संदीप मानकर अमरावती
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवंत जीवनपट सादर करणाऱ्या ‘जाणता राजा’ या लोकप्रिय महानाट्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारी व आबालवृद्धांचे आकर्षण ठरलेली लक्ष्मी नावाची हत्तीण ४७ वर्षांची झाली आहे. तिचे या नाटकात २० वर्षांचे आयुष्य झाले आहे, हे विशेष.
४ टन वजन असलेली लक्ष्मी स्वभावाने अतिशय शांत आहे. चार दिवसांपूर्वीच ती विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अंबानगरीत ‘जाणता राजा’ नाट्यातील कलावंतांसमवेत दाखल झाली आहे. येथील सायंस्कोर मैदानात हे महानाट्य चार दिवसांपासून सुरु आहे. त्याकरीता एक हत्तीण , ४ उंट व ४ घोडे येथे आणण्यात आले आहे.
लक्ष्मीला बिहारवरुन आणले
अमरावती : दुपारी लक्ष्मीला मैदानातील खुल्या जागेत ठेवण्यात येते. येथे तिला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. सद्यस्थितीत ती मुंबईच्या बोरीवली भागात राहते. बिहार येथून तिला २० वर्षांपूर्वी आणण्यात आले होते. तेव्हापासून ती जाणता राजा महानाट्यात वास्तविक चित्रीकरणासाठी तिची भूमिका आहे. अशी महिती माहूत रामलखन मिश्रा (उत्तरप्रदेश) यांनी लोकमतशी बोलताना दिली. लक्ष्मीला खाद्य म्हणून खास ऊस आणण्यात आले आहेत. तसेच काकडी, पालक, गव्हाची पोळी हे तिचे खाद्य आहे. सायंकाळी या महानाट्याच्या वेळेस तिला सजविण्यात येते.
लक्ष्मी ही ४७ वर्षांची असून तिचे वजन ४ टन आहे. २० वर्षांपासून ती या महानाट्यात सेवा देत आहे. त्याच समर्पित भावनेने मी तिची सेवा करतो. मलाही त्यात आनंद मिळतो.
-रामलखन मिश्रा, बोरीवली, मुंबई