जान्हवीने दिला मातेच्या चितेस भडाग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:09 IST2021-07-18T04:09:57+5:302021-07-18T04:09:57+5:30
कुटुंबीयांचा पुढाकार, आईच्या इच्छेचा स्वीकार पथ्रोट : मुलगा नसल्याची खंत न बाळगता जीवन जगलेल्या मातेने कुटुंबातील पुरुषांऐवजी मुलीने अंत्यसंस्कार ...

जान्हवीने दिला मातेच्या चितेस भडाग्नी
कुटुंबीयांचा पुढाकार, आईच्या इच्छेचा स्वीकार
पथ्रोट : मुलगा नसल्याची खंत न बाळगता जीवन जगलेल्या मातेने कुटुंबातील पुरुषांऐवजी मुलीने अंत्यसंस्कार करावा, अशी अंतिम इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार कुटुंबीयांनी पुढाकार घेत मुलीकडून अंतस्विधी घडविला. पथ्रोट येथे ही घटना लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
पथ्रोट येथील नीता श्याम सोनार या महिलेचे गुरुवारी रात्री नागपूरच्या वोक्हार्ट इस्पितळात किडनीच्या आजाराने निधन झाले. पतीपश्चात जान्हवी, कृष्णा या दोन मुलींना घेऊन त्यांनी १३ वर्षे संसार केला. तळेगाव श्यामजीपंत येथे माहेरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले गेले. त्यावेळी नीता यांच्या इच्छेनुसार मोठ्या लेकीने भडाग्नी द्यावा, असे भासरे योगेश्वर सोनार यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी दुपारी २ वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. जेष्ठ कन्या जान्हवीने मातेस भडाग्नी देत समाजात नवा पायंडा पाडला.