चिखलदऱ्याच्या देवी पॉइंटवरील जनादेवी, आदिवासींसह सर्वसामान्यांची श्रद्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 07:54 PM2017-09-28T19:54:40+5:302017-09-28T19:55:09+5:30

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर महत्त्वाचा पॉर्इंट (देवी पॉर्इंट) वर्षभरात हजारो भक्तांसह पर्यटक येथे आवर्जून भेट देतात चैत्र महिन्यासह नवरात्रोत्सवात देवी पॉर्इंटवर हजारो भक्तांची गर्दी असते.

Jana Devi, Adivasis on the Goddess of Mithali | चिखलदऱ्याच्या देवी पॉइंटवरील जनादेवी, आदिवासींसह सर्वसामान्यांची श्रद्धा

चिखलदऱ्याच्या देवी पॉइंटवरील जनादेवी, आदिवासींसह सर्वसामान्यांची श्रद्धा

googlenewsNext

चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर महत्त्वाचा पॉर्इंट (देवी पॉर्इंट) वर्षभरात हजारो भक्तांसह पर्यटक येथे आवर्जून भेट देतात चैत्र महिन्यासह नवरात्रोत्सवात देवी पॉर्इंटवर हजारो भक्तांची गर्दी असते. यंदा मात्र मंदिर प्रशासनाच्या आततायीपणामुळे पायºया खचल्यामुळे दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. देवी मंदिराच्या वरील भागात घटस्थापना करण्यात आल्याने भक्तांना तेथूनच दर्शन घेऊन परतावे लागत आहे. परतवाडा ते चिखलदरा या ३२ किलोमीटर अंतरावरील महापदयात्रा रद्द करण्यात आली होती. नवरंग मंडळाच्या मोजक्या भक्तांनी खंड पडू नये याकरिता कावड आणून माताराणीचे दर्शन घेतले.

जनादेवी, दुर्गा, अंबा
 आदिवासींची कुलदैवत असल्याने देवी पॉर्इंटवर मोठ्या संख्येने मेळघाटच्या धारणी, चिखलदरा तालुक्यासह अचलपूर, मध्यप्रदेशच्या खंडवा, ब-हाणपूर, बैतूल भागातील आदिवासी मोठ्या संख्येने येथे देवीच्या दर्शनासाठी येतात, तर परतवाडा, अमरावतीसह विदर्भातील अनेक शहरांतून भक्तांची मांदियाळी येथे पहायला मिळते. आदिवासी जनादेवी तर सर्वसामान्य मरीमाय, दुर्गादेवी, अंबादेवी असे श्रद्धेनुसार नाव घेऊन तेथे पूजाअर्चा करतात.

एलईडीवरून दर्शन
 नवरात्रोत्सवात भक्तांची गर्दी पाहता मंदिरातून सीसीटीव्ही सह देवीपुढील भागात एलईडी लावून देवीचे दर्शन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदा पायºया खचल्याने भक्तांवर असा प्रसंग ओढावला आहे.

Web Title: Jana Devi, Adivasis on the Goddess of Mithali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.