पथ्रोट येथील जलसुराज्य योजनेचा प्रवास अडखळत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:12+5:302021-04-05T04:12:12+5:30
पथ्रोट : शहानूर धरणाचे पाणी पथ्रोटवासीयांना मिळावे, या उद्देशाने शासनाने जलसुराज्य योजना मंजूर केली. जीवन प्राधिकरणाला वर्क ऑर्डर देण्यात ...

पथ्रोट येथील जलसुराज्य योजनेचा प्रवास अडखळत!
पथ्रोट : शहानूर धरणाचे पाणी पथ्रोटवासीयांना मिळावे, या उद्देशाने शासनाने जलसुराज्य योजना मंजूर केली. जीवन प्राधिकरणाला वर्क ऑर्डर देण्यात आली. मात्र, ही योजना राबवित असताना या योजनेमध्ये अनेक अडथळे आले. त्यात कोरोनाचे सावटात ही योजना पूर्णत्वास न जाता पथ्रोटवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही योजना डिसेंबरअखेर पूर्णत्वास जाण्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत.
शहानूर धरणापासून ही योजना पथ्रोट गावापर्यंत आठ किमी, तर अंतर्गत गावामध्ये वाॅर्ड नं. २ तेलखडी येथे ३ लाख ४० हजार लिटर क्षमतेच्या पथ्रोट पोलीस ठाण्याच्या मागे २ लाख २० हजार क्षमतेच्या व पथ्रोट पोलीस ठाण्यासमोर असलेल्या तीन लाख लिटर क्षमतेच्या जुन्या टाकीमधून पथ्रोट गावाला पाणीपुरवठा होणार आहे. पथ्रोट गावातील ५ वार्डात एकूण लहान मोठे ३६ व्हाॅल्व्ह आहेत. ४८५० नळजोडणी असून, त्यापैकी २८०० नळ जोडणी, ज्यांनी ग्रामपंचायतचा कर भरला, त्यांना देण्यात आले. अधिकाऱ्यांनुसार, या योजनेच्या कामाकरिता परराज्यातून मजूर बोलावण्यात आले होते. ते मजूर कोरोनाच्या संसर्गामुळे परत गेले. बाकी शिल्लक कामांकरिता मेळघाटातून आदिवासींना बोलावण्यात आले. पुन्हा होळीनिमित्त ते मजूर निघून गेले. त्यात संबंधित कंत्राटदाराला दंड आकारण्यात आला. त्यामुळे ही योजना पूर्णत्वास जाण्यास विलंब होत आहे. सद्यस्थितीत सिमेंट रस्त्याची दुरुस्ती, पाण्याच्या टाकींना वॉल फिनिशिंग, प्लांट शुद्धीकरण शिल्लक राहिले आहे. मात्र, पाच महिन्यांपासून काही भागात शहानूरच्या पाण्याचे भरलेल्या टाकीमधील पाणी एक दिवसाआड सोडले जात आहे.