भातकुली तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाची मुहूर्तमेढ

By Admin | Updated: May 24, 2015 00:28 IST2015-05-24T00:28:54+5:302015-05-24T00:28:54+5:30

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची मुहूर्तमेढ भातकुली तालुक्यातील विविध गावांमध्ये रोवल्या गेली आहे.

Jalakit Shivaraya campaign started in Bhatkuli taluka | भातकुली तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाची मुहूर्तमेढ

भातकुली तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाची मुहूर्तमेढ

दोन कोटी रुपये खर्च : जिल्हाधिकारी गीत्ते, रवी राणा यांनी केली पाहणी
अमरावती : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची मुहूर्तमेढ भातकुली तालुक्यातील विविध गावांमध्ये रोवल्या गेली आहे. सुमारे दोन कोटी रुपये त्याकरिता खर्च होणार असून शुक्रवारी जिल्हाधिकारी किरण गीत्ते, आ. रवी राणा यांनी गावागावांत जाऊन प्रत्यक्ष कामांची पाहणी केली.
भातकुली तालुक्यातील हरताळा, सायत, भातकुली, खालखोणी, इंदापूर, आसरा, कुमागड, चेचरवाडी आदी गावांमध्ये तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, शेततळे, खोदतळे आदी कामे युद्धस्तरावर सुरु आहेत.
ही कामे व्यवस्थितपणे सुरु आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी गीत्ते, आ. राणा यांनी ४६.७ अंश सेल्सियस तापमानातही गावागावातून जाऊन जलयुक्त शिवार अभियानाची कामे बघितली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अनिल खर्चान, उपविभागीय अधिकारी जगताप, तालुका कृषी अधिकारी म्हस्के, नायब तहसीलदार बागडे आदी उपस्थित होते.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना या अभियानामुळे भुजलस्तर वाढणार यात दुमत नाही. येत्या काळात शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावे लागणार नाही.
पाणी टंचाईतूनही मुक्ती मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. परंतु गावात जिल्हाधिकारी, आमदार येवून गावकऱ्यांशी संवाद साधत समस्या, प्रश्न जाणून घेत असल्याचा आनंद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर बघावयास मिळाला.
कामांची पाहणी करताना पंचायत समिती सदस्य संगीता चुनकीकर, सरपंच अनिल वर्धे, उपसरपंच दीपक मानकर, सतीश चक्रे, विनोद कुटेमाटे, शेख रहेमान, शे. करीम, मीेना मानकर, पल्लवी केरटे, ममता कावरे, जगदेव मानकर, नारायण मानकर, जगदीश काळे, राजू चुनकिकर, भाष्कर पाचकवडे, गणेश पाचकवडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला झुणका-भाकरीचा आस्वाद
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या विविध गावांतील कामांची पाहणी करताना जिल्हाधिकारी किरण गीत्ते, आ. रवी राणा यांनी चक्क आमराईत बसून झुनका भाकरीचा आस्वाद घेतला. ग्रामस्थांशी संवाद साधून पेरणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

Web Title: Jalakit Shivaraya campaign started in Bhatkuli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.