जलजागृती ही लोकचळवळ व्हावी
By Admin | Updated: March 24, 2016 00:43 IST2016-03-24T00:43:18+5:302016-03-24T00:43:18+5:30
राज्यात मागील काही वर्षांत नैसर्गिक बदलांमुळे तसेच पावसाचे प्रमाण अनिश्चित झाल्याने पाण्याची उपलब्धता कमी होत आहे.

जलजागृती ही लोकचळवळ व्हावी
ज्ञानेश्वर राजुरकर : जलजागृती सप्ताहाचा समारोप, पाणी बचतीचे सुचविले उपाय
अमरावती : राज्यात मागील काही वर्षांत नैसर्गिक बदलांमुळे तसेच पावसाचे प्रमाण अनिश्चित झाल्याने पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे सतत अवर्षणाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा अतिशय काळजीपूर्वक व काटकसरीने सुनियोजित वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु पाण्याची बचत व जागृती केवळ जलजागृती सप्ताहापुरती मर्यादित न राहता ती लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी जलजागृती सप्ताहाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी किरण गीत्ते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डी.डी. पोहेकर, संजय घाणेकर, अधीक्षक अभियंता लांडेकर, प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कृषी सहसंचालक सरदार, अधीक्षक अभियंता बागडे व पगारे उपस्थित होते