‘त्या’ जवानाचा खोलापुरी गेट ठाण्यात विवाह
By Admin | Updated: November 2, 2016 00:29 IST2016-11-02T00:29:47+5:302016-11-02T00:29:47+5:30
आठ दिवस संसारानंतर पत्नीला सोडून गेलेल्या पतीविरुद्ध रिपाइंने खोलापुरी गेट पोलिसात तक्रार केली होती.

‘त्या’ जवानाचा खोलापुरी गेट ठाण्यात विवाह
पोलिसांची मध्यस्थी : संघटनांचाही पुढाकार
अमरावती : आठ दिवस संसारानंतर पत्नीला सोडून गेलेल्या पतीविरुद्ध रिपाइंने खोलापुरी गेट पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांच्या मध्यस्तीमुळे दोघांमधील वाद मिटविण्यात आल्याने सोमवारी दोघेही खोलापुरी गेट ठाण्यातच विवाह बद्ध झाले.
जि.प.सदस्य विनोद डांगे, प्रहारचे जोगेंद्र मोहोड, रिपार्इंचे अमोल इंगळे यांनी अश्विनीला मदतीचा हात दिला. संघटनेच्या कार्यकर्तेंनी खोलापुरी गेट पोलिसांना तक्रार सादर करून नीलेशच्या अटकेची मागणी केली. तक्रार प्राप्त होताच ठाणेदार अनिल कुरुळकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय थोरात यांनी चौकशी करून नीलेशशी संपर्क साधला. सोमवारी सकाळी ११ वाजता नीलेश कुटुंबीयांसमवेत खोलापुरी गेट ठाण्यात आल्यानंतर दोघांचीही पोलिसांनी समजूत काढली. त्यानंतर अश्विनीला पत्नी म्हणून स्वीकार करणार असल्याचे नीलेशने पोलिसांना लिहून दिले. एवढेच नाही, तर दोघांनीही ठाण्यातच विविहबद्ध होण्याचा निर्णय घेऊन एकमेकांच्या गळ्यात हार घातला. यावेळी नीलेशची आई प्रमिला वानखडे, मुलीचे आई-वडीलासह गजानन मोहोड, प्रमोद शिरसाठ, अनिल पंखाले, अतुल राऊत, मंगेश साबळे, मनोज वानखडे, श्रीधर गडलिंग आदी उकपस्थित होते. (प्रतिनिधी)