जयस्वाल यांनी परस्पर केले ८० गाळ्यांचे करारनामे
By Admin | Updated: May 16, 2015 00:49 IST2015-05-16T00:49:54+5:302015-05-16T00:49:54+5:30
स्थानिक तहसील नजीकच्या महापालिका खत्री कॉम्प्लेक्समध्ये गाळ्यांचे नियमबाह्य करारनामे केल्याप्रकरणी ‘सर्चिंग’ ...

जयस्वाल यांनी परस्पर केले ८० गाळ्यांचे करारनामे
कोटींचा अपहार : खत्री कॉम्प्लेक्सप्रकरणी ‘सर्चिंग’ सुरु
अमरावती : स्थानिक तहसील नजीकच्या महापालिका खत्री कॉम्प्लेक्समध्ये गाळ्यांचे नियमबाह्य करारनामे केल्याप्रकरणी ‘सर्चिंग’ सुरु झाले आहे. हे प्रकरण न्यायालयात ‘स्टँन्ड’ करता यावे, यासाठी प्रशासनाने सबळ पुरावे गोळा करण्याची तयारी चालविली आहे. बाजार व परवाना विभागाचे तत्कालीन अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी ८० गाळ्यांचे करारनामे स्वत: उपनिबंधक कार्यालयात स्वाक्षरीनिशी करुन दिल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकेने तहसील कार्यालयानजीक बीओटी तत्त्वावर साकारलेल्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये २१३ गाळे आहेत. या संकुलाचा करार सन २०१८ मध्ये संपुष्टात येणार आहे. यानंतर प्रशासनाने गाळेधारकांशी नव्याने करारनामे करणे अपेक्षित होते. मात्र, जयस्वाल यांनी ८० रिक्त दुकानांचे परस्पर करारनामे करुन कोटी रुपयांचा सौदा केल्याची माहिती पुढे येत आहे. प्रशासकीय प्रमुख असलेल्या आयुक्तांचे अधिकारपत्र न घेता तसेच या करारनाम्याबाबत बाजार व परवाना विभागात कोणतीही नोंद न ठेवता हा व्यवहार परस्पर करण्याची किमया गंगाप्रसाद जयस्वाल यांनी केली आहे.