जैन महिला जागृती मंचची वाचनालयाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST2021-06-28T04:10:38+5:302021-06-28T04:10:38+5:30

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच शाखा वर्धेच्या अध्यक्ष शोभा जैन, साधना बन्नोरे, किरण पाटणी, ...

Jain Mahila Jagruti Manch helps the library | जैन महिला जागृती मंचची वाचनालयाला मदत

जैन महिला जागृती मंचची वाचनालयाला मदत

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच शाखा वर्धेच्या अध्यक्ष शोभा जैन, साधना बन्नोरे, किरण पाटणी, आशा पाटणी, सचिव यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. यावेळी तिवसा न. पं. चे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, प्रमोद बोराळकर, विद्यार्थ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पूजन करून महाराजांची जयंती साजरी केली.

आर. एम. धारीवाल फॉउंडेशन पुणे यांच्याकडून तसेच राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज वाचनालायला पूलक प्याऊ(अंदाजे १.२५ लाख) भेट म्हणून देण्यात आला. त्याप्रीत्यर्थ त्यांनी वाचनालयाला सदिच्छा भेट देत पुस्तक स्वरूपात, रोख स्वरूपात व धनादेश स्वरूपात मदत दिली. शेवटी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी राजाभाऊ देशमुख, सुयोग गोरे, वैभव काकडे, सुमित अनासने, हरीष फरकाडे,आनंद मानमोडे, आकाश धडांगे, सूरज धडांगे, सौरभ इंगळे, स्वप्निल कुर्हेकर, गंगाधर नाखले काका, राहुल धडांगे, विनय चव्हाण, आकाश गोरले, निकिता डगवार, अंकुश केवदे, प्रियंका डहाके, कांचन बहाद्दरपुरे, अर्चना ठाकरे व इतर वाचक वर्ग उपस्थित होते.

Web Title: Jain Mahila Jagruti Manch helps the library