शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

राज्यातील तुरुंगांमध्ये १३७ टक्के कैदी, ५४ कारागृहे हाऊसफुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 18:21 IST

राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून, ते प्रमाण तब्बल १३७ टक्के आहे. यामुळे कैद्यांच्या सुरक्षिततेसह अन्य प्रश्न निर्माण झाले आहेत.

प्रदीप भाकरेअमरावती : राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून, ते प्रमाण तब्बल १३७ टक्के आहे. यामुळे कैद्यांच्या सुरक्षिततेसह अन्य प्रश्न निर्माण झाले आहेत. कारागृहांमधील बराकींची संख्या वाढविण्याबरोबर मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे नवीन कारागृह उभारणी प्रस्तावित आहे. त्या पार्श्वभूमीवर कारागृहांची कैदी सामावून घेण्याची क्षमता आणि प्रत्यक्षात असलेले कैदी यातील विषमता नव्याने अधोरेखित झाली आहे.राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत, तर वर्ग १ चे १९ , वर्ग २ चे २३ व वर्ग ३ चे ३ अशी एकूण ५४ कारागृहे आहेत. यात विशेष कारागृह, खुले कारागृह, महिला कारागृह, खुली वसाहत, किशोर सुधारालय व कारागृह रुग्णालयांचा सामावेश आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये संख्येनुसार, राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेच्या १३७ टक्के कैदी तूर्तास आहेत.सर्व कारागृहांची अधिकृत बंदिसंख्या २३ हजार ९४२ अशी असताना, प्रत्यक्षात ३२ हजार ७८५ कैदी कारावास भोगत आहेत. यातील नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये २२ हजार १३५ पुरुष व ६७० महिला कैदी आहेत. १९ अ-वर्ग जिल्हा कारागृहांमध्ये ५ हजार ५०२ पुरुष, तर २०७ महिला कैदी आहेत. २३ वर्ग-२ मध्ये मोडणा-या जिल्हा कारागृहांमध्ये ३ हजार ५३५ पुरुष व ५२९ महिला, तर वर्ग ३ च्या तीन कारागृहांमध्ये २०० पुरुष व ३ महिला असे एकूण ३२ हजार ७८५ कैदी आहेत.महिला कैद्यांचे प्रमाणही अधिकतुरुंगातील क्षमतेपेक्षा महिला कैद्यांचे प्रमाण ११७ टक्के आहे. राज्यातील ५४ कारागृहांची महिला बंदींची क्षमता १२०१ आहे. प्रत्यक्षात १४१३ महिला कैदी आहेत. भायखळा तुरुंगात मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महिला कैद्यांची जादा संख्या व त्यांची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे. या १४१३ महिला बंद्यांमध्ये १०४९ न्यायाधीन, तर ३६४ सिद्धदोष कैदी आहेत.कारागृहातील बंद्यांची संख्याबंदी प्रकार    पुरुष         स्त्री         एकूणसिद्धदोष       ८७७        ३६४      ८८३४न्यायाधीन      २२८०८    १०४९    २३८५७स्थानबद्ध       ९४            ०            ९४

टॅग्स :jailतुरुंग