कारागृहात आता सोलर चरख्यातून खादी उद्योग

By Admin | Updated: February 8, 2016 00:23 IST2016-02-08T00:23:19+5:302016-02-08T00:23:19+5:30

कारागृह हे सुधारगृह बनविण्यासह रोजगार निर्मितीचे साधन व्हावे, यासाठी बंद्यासाठी आता सोलर चरख्यातून खादी उद्योग साकारला जाईल, ....

In the jail now, the Khadi industry from Solar Charkha | कारागृहात आता सोलर चरख्यातून खादी उद्योग

कारागृहात आता सोलर चरख्यातून खादी उद्योग

स्वाती साठे यांची माहिती : एलईडी दिवे बनविणे पायलट प्रकल्पाचा शुभारंभ
अमरावती : कारागृह हे सुधारगृह बनविण्यासह रोजगार निर्मितीचे साधन व्हावे, यासाठी बंद्यासाठी आता सोलर चरख्यातून खादी उद्योग साकारला जाईल, असे कारागृह प्रशासनाच्या उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांनी येथे स्पष्ट केले. त्या येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या एलईडी दिवे पायलट प्रोजेक्ट उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होत्या.
येथील मध्यवर्ती कारागृहात एलईडी दिवे तयार करण्याचा प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी वर्धा येथील महात्मा गांधी इंन्स्टिट्यूट आॅफ ग्रामीण इंडस्ट्रिज (एमगिरीे) चे संचालक पी. बी. काळे, कारागृह अधीक्षक एस. व्ही. खटावकर, वरिष्ठ तुरुगांधिकारी आनंद पिल्लेवान, नितीन क्षिरसागर, कारागृहाचे शिक्षक भूषण कांबळे, प्रशिक्षक संजय बगाडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना स्वाठी साठे म्हणाल्या, अमरावती कारागृहातील २२ बंदीजणांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीज तंत्री म्हणून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर वीज तंत्रीचा अनुभव एलईडी दिवे तयार करण्यासाठी वापरला.
प्रायागिक तत्वावर १०० एईडी दिवे तयार करण्यात आले असून ते बाजार भावानुसार निम्म्या किंमतीत तयार करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार सर्वच शासकीय कार्यालयात एलईडी दिवे वापर करताना ते कारागृहातून निर्मित वापरावे, असा शासन आदेश पारीत करण्यासाठी कारागृह प्रशासन प्रयत्न करेल, असे त्या म्हणाल्या. कारागृहात खादी कापड उद्योग सुरु करणार आहोत. हे खादी उद्योग सोलर चरख्यावर सूत तयार करुन नंतर खादी कापड तयार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. सोलर चरख्यामुळे वीजेची बचत तर होईलच पण, बंदीजणांना रोजगार उपलब्ध होईल. ८ फेब्रुवारी सोमवारपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात हातमागावर साडी निर्मिती सुरु होणार आहे. सद्या बाजारात साडी मिळत नाही. मात्र आम्ही बंद्याकडून ही साडीे तयार करणार आहोत. जसा साडीचा वापर होईल तशी ती चमक ते, अशी या साडीची विशेषत: आहे. कारागृहात परंपरागत साहित्य निर्मिती ऐवजी दैनंदिन वापराच्या वस्तू, साहित्य निर्मितीवर भर दिला जाणार असल्याचे साठे यांनी सांगितले.

या बंद्यांना प्रमाणपत्राचे वितरण
एमगिरी या संस्थेकडून एलईडी दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या बंदीजणांना कारागृह प्रशासनाच्या उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यात सुदर्शन विघ्ने, नागेश वानखडे, गुणवंत ठाकरे, राजेश पाखरे, मोतीराम सिरसाट, रवींद्र ढोके, संदीराज कपाटे, विनोद भैसे, गोकु ल रणगिरी, शंकर उईके, सुभाष गावंडे या बंदीजनांचा समावेश होता.

खुनाच्या शिक्षेतील आरोपींनी मांडल्या व्यथा
कारागृह प्रशासनाच्या उपमहानिरिक्षक स्वाती साठे एलईडी दिवे तयार करण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करुन परताना त्यांच्या पुढ्यात खुनाच्या शिक्षेतील आरोपी जसपालसिंग सैनी व हरजसंिग सैनी या बंधूंनी कारागृह स्थलांतर बाबात व्यथा मांडल्या. १० वर्षे शिक्षेची पूर्ण झाल्यानंतरही खुले कारागृहात स्थलांतर केले जात नाही, असा आरोप केला. हा प्रस्ताव वरिष्ठाकडे प्रलंबित असल्याचे सैनी बंधुनी सांगितले. दरम्यान खुनाच्या शिक्षेतील आरोपी बादलसिंग टाक याने देखील संचीत रजेबाबत व्यथा मांडल्या.

Web Title: In the jail now, the Khadi industry from Solar Charkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.