जगतापांना पक्षातूनच कडवा विरोध!
By Admin | Updated: June 11, 2014 22:59 IST2014-06-11T22:59:37+5:302014-06-11T22:59:37+5:30
काँग्रेस पक्षातील अनुभवी आमदार असलेले वीरेंद्र जगताप यांना त्यांच्या काँग्रेस पक्षातूनच तिबार उमेदवारीसाठी कडवा विरोध आहे. कठोर वाणीमुळे मने दुखावलेल्यांची फळीच त्यांच्याविरुद्ध बाह््या खोचून उभी

जगतापांना पक्षातूनच कडवा विरोध!
तिकीटच अनिश्चित : वाणीने केला घात, चव्हाणांच्या नावाचा जोर
गणेश देशमुख - अमरावती
काँग्रेस पक्षातील अनुभवी आमदार असलेले वीरेंद्र जगताप यांना त्यांच्या काँग्रेस पक्षातूनच तिबार उमेदवारीसाठी कडवा विरोध आहे. कठोर वाणीमुळे मने दुखावलेल्यांची फळीच त्यांच्याविरुद्ध बाह््या खोचून उभी ठाकली आहे. नव्या चेहऱ्याची मागणी काँग्रेस
पक्षातून रेटली जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षनिर्णय नेमका काय होणार, याबाबत कमालीचे औत्सुक्य आहे.
विधिमंडळाच्या कामकाजात अधिकाधिक सहभाग दर्शविणारे जगताप शेतकरी आहेत. मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या जगतापांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकवेळी हुलकावणीच दिली. स्वत:च्या कार्यकर्त्यांसाठी वाट्टेल ते करणारे जगताप त्यांचे कार्यकर्ता
नसलेल्यांची मात्र कामे होणार नाहीत याची दक्षता घेतात. नोकरशहांवर कायम दबदबा ठेवणारे हे आमदार मऊ जिभेचा तीक्ष्णपणे वापर करतात. ताकद बनू शकणारे काँग्रेस पक्षातील सहकारी आमदारांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांचे त्यामुळेच शत्रु
बनले आहेत. जगतापांचे पक्षातील स्थान वाढू नये यासाठी त्यांच्याच पक्षातून त्यांना सुरूंग लावणे सुरू झाले आहे. माजी राज्यमंत्री यशवंतराव शेरेकर खुलून मैदानात उतरले आहेत. जगताप यांच्या गृह तालुक्यातूनही त्यांना पक्षांतर्गत विरोध आहे.
गावागावांत स्वत:चा गट तयार करण्याच्या नादात जगतापांनी पक्षात दोन गट निर्माण केलेत. त्यांच्या पतंगबाजीचा गुंता आता त्यांच्याचसमोर उभा ठाकला आहे.
पोलीस रेकॉर्डवरही नोंद
आमदारांची एकंदर छबी आणि कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयाला काही महिन्यांपूर्वी तटस्थ गोपनीय अहवाल मागविला होता. जगतापांच्या आक्रमक वागणुकीचा मुद्दा त्या अहवालातही अधोरेखित करण्यात
आला आहे. जगताप सत्तापक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत. ते संयमाने वागत नसल्यामुळे शासनाच्या छबीवर त्याचा विपरित परिणाम होतो, अशा आशयाचा मायना जगतापांबाबत त्या अहवालात नोंदविण्यात आला आहे.
मुख्यंमंत्र्यांच्या उपस्थितीतील शासकीय कार्यक्रमादरम्यान पोलिसांना कर्तव्य बजावू न दिल्यामुळे जगतापांविरुद्ध गुन्ह्याचीही नोंद पोलिसांत आहे.