शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात पिवळ्या भेसळयुक्त गुळाची मोठ्या प्रमाणात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 14:36 IST

Amravati News घाटाच्या गुळासाठी सुप्रसिद्ध असलेल्या चांदूर बाजार तालुक्यात पिवळ्या भेसळयुक्त गुळाची मोठ्या प्रमाणात विक्रीही केली जात आहे.

ठळक मुद्देअन्न सुरक्षा विभागाचे दुर्लक्षसल्फरच्या अत्याधिक मिश्रणाने गुळाचा पिवळा रंग

सुमीत हरकुट

 लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती: घाटाच्या गुळासाठी सुप्रसिद्ध असलेल्या चांदूर बाजार तालुक्यात पिवळ्या  भेसळयुक्त गुळाची मोठ्या प्रमाणात विक्रीही केली जात आहे. रवेदार तसेच आरोग्यास गुणकारी असलेल्या घाटाच्या गुळाची आजही मागणी आहे. मात्र, ती तालुक्याबाहेरच जास्त असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते. घाटाचा गूळ व सेंद्रिय गुळाच्या नावावर नागरिक रसायनयुक्त पिवळ्या गुळाला तालुक्यातील नागरिकांकडून वापर केला जात आहे.

गुळाला पिवळा रंग येण्यासाठी सल्फरची पावडर मिसळण्याची पद्धत आहे. मात्र, सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा गुळात जास्तच भेसळ होत आहे. त्यासोबत अन्य काही रसायनेसुद्धा मिसळली जात आहेत. याकडे अन्न सुरक्षा विभागाने कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. या पिवळ्या व स्वछ दिसणाऱ्या गुळात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रेग्यूलेशन २०११ च्या कायद्यानुसार गुळात जास्तीत जास्त ७० पीपीएम इतके सल्फर डायऑक्साईड वापर करण्याची परवानगी आहे. परंतु, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने गूळ तयार करणारे आपल्या अंदाजाने सल्फर मिसळत असतात. मुळात हे प्रमाण ३५० ते १००० पीपीएम सुद्धा असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो. कोणत्याही पदार्थांना अधिक पिवळेपणा येण्यासाठी ‘मेटॅनिल येलो’ ही रासायनिक पूड वापरली जाते.

हळदीतही ‘मेटॅनिल येलो’चा वापर

हळद पावडरमध्ये मेटॅनिल येलो पूड वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे गूळ पिवळाधमक करण्यासाठी काही ठिकाणी मेटॅनिल येलो या रसायनाचा वापर केला जातो. त्यानंतर वापरला जाणारा घटक म्हणजे सोडियम बायकार्बोनेट हा आहे. सर्वसाधारणपणे गूळ तयार करण्यासाठी सर्रास सोडियम कार्बोनेटचा वापर होत असतो. याशिवाय झेडएफएस आणि सोडियम हाड्रोफॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट अशा रसायनाचा उपयोग गुळाला अधिकाधिक चमकदार करण्यासाठी केला जातो.

जीवघेणे आजार होण्याची शक्यता

रसायनाचा अधिक वापर केल्याने अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते. यामुळे रसायनाचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने गूळ तयार करणे हे आरोग्यासाठी हितावह ठरते. मात्र, नफा मिळवण्याच्या नादात याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे. यामुळे गूळ खरेदी करताना नैसर्गिकपणा तपासणे गरजेचे झाले आहे.

अशी होते गूळनिर्मिती

सर्वसाधारणपणे गुळाची निर्मिती करताना गुळाचा रस उकळला जातो. त्यावेळी त्यातील कचरा काढण्यासाठी चुना टाकला जातो. त्यानंतर त्यात भेंडीच्या पानांची पावडर टाकली जाते. त्यामुळे गुळाला चव येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी