जागर वृक्ष लागवडीचा...
By Admin | Updated: June 21, 2016 00:04 IST2016-06-21T00:04:58+5:302016-06-21T00:04:58+5:30
‘कावळा म्हणतो काव-काव..एक तरी झाड लाव’ यांसारख्या अनेक म्हणी, घोषणांच्या गजरात शासकीय विश्रामगृहातून सोमवारी वृक्षदिंडी काढण्यात आली.

जागर वृक्ष लागवडीचा...
जागर वृक्ष लागवडीचा... ‘कावळा म्हणतो काव-काव..एक तरी झाड लाव’ यांसारख्या अनेक म्हणी, घोषणांच्या गजरात शासकीय विश्रामगृहातून सोमवारी वृक्षदिंडी काढण्यात आली. शासनाने १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यानुषंगाने जनजागृतीसाठी सोमवारी ही दिंडी काढण्यात आली. यामध्ये टाळ-मृदंगांसह दस्तुरखुद्द पालकमंत्री प्रवीण पोटे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपवनसंरक्षक निनू सोमराज, दिनेश त्यागी, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांच्यासह अनेक गणमान्य सहभागी झाले होते. या रॅलीचा समारोप विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आला.