शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

महानगरात ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:34 PM

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जानेवारी महिन्यात होणाºया स्वच्छ सर्वेक्षणासाठी अमरावती सज्ज झाले आहे.

ठळक मुद्देमनपा प्रशासन कामाला : जनजागृतीवर भर, स्वच्छता अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमतअमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जानेवारी महिन्यात होणाºया स्वच्छ सर्वेक्षणासाठी अमरावती सज्ज झाले आहे. देशभरातील ४०४१ शहरांमध्ये होणाऱ्या या स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या शंभरात येण्याचा संकल्प महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यानी केला असून त्यासाठी सोशल मिडीयाचा वापरही प्रभावीेपणे केला जात आहे.या अभियानात अमरावतीकरांचा सहभाग वाढावा, यासाठी पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी कर्मचारी स्वच्छतेसाठी जनजागृती करीत आहेत.जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये ४ हजार गुणांचे स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले असून गतवर्षी या परीक्षेत शहर २३१ क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र प्रशासन व पदाधिकारी हातात हात घालून स्वच्छ सर्वेक्षणात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ब्रँन्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून अभिनेता भारत गणेशपुरे यांनी तरुणाईला साद घालत शहरातील महाविद्यालये पालथी घातली. इंदूरने स्वच्छतेत पहिला क्रमांक पटकाविला तो निव्वळ लोकसहभागातून. तोच लोकसहभाग अमरावतीकरांना द्यावा, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नरत आहे. शहरातील सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, क्रेडाई, क्लब, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आदींच्या बैठकी, कार्यशाळा घेऊन त्यांना स्वच्छ सर्वेक्षणाची संपूर्ण माहिती देण्यात आली. कचरा विलगीकरण, इतवारा व सुकळी येथे कचºयावर प्रक्रिया करण्याचे छोटेखानी प्रकल्प साकारण्यात आले. महापालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभाग प्रभावीपणे प्रचार व प्रसार करताना दिसत आहे. अल्प मनुष्यबळ व मर्यादित साधनसामुग्रीवर मात करत स्वच्छतेसाठी विद्यार्थी या महत्त्वपूर्ण घटकाचे सहकार्य घेण्यात येत आहे. स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावरील तक्रारींचा निपटारा करणे, अधिकाधिक नागरिकांचा सहभाग असणे यावर ४०० गुण आहेत. शहरात आतापर्यत १३ हजारांहून अधिक सवच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले असून उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाने यश प्राप्त केले आहे. स्वच्छ सर्वेक्षणाची माहिती प्रत्येक नागरिकाला व्हावी, यासाठी मॉल, मंगल कार्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, सरकारी कार्यालये, पोहोचून स्वास्थ्य निरीक्षक जनजागृती करीत आहेत.सोशल मीडिया प्रभावीस्वच्छ सर्वेक्षण म्हणजे नेमके काय, याबाबत लोकांना माहिती व्हावी, यासाठी महापालिका फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप या माध्यमांचा वापर करीत आहे. महापालिका आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, सभागृहनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, बसप, शिवसेना, एमआयएमचे गटनेता, वैेद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, एसबीएमच्या समन्वयक श्वेता बोके , स्वच्छता अधिकारी अजय जाधव, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, स्वास्थ्य निरीक्षक स्वच्छ सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अमरावतीकरांनी ‘आपले अभियान ’म्हणून महापालिकेला सहकार्य करावे, आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासन व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी केले आहे.