- हे तर दरोडेखोरांना दिशादर्शनच!

By Admin | Updated: May 27, 2015 00:23 IST2015-05-27T00:23:12+5:302015-05-27T00:23:12+5:30

अमरावती शहरातील एका एटीएम मशीनमध्ये पैसे 'लोड' करताना अवलंबिली जाणारी पद्धती दरोडेखोरांना दिशादर्शन करणारी ....

It's a guide to the robbers! | - हे तर दरोडेखोरांना दिशादर्शनच!

- हे तर दरोडेखोरांना दिशादर्शनच!

गणेश देशमुख अमरावती
अमरावती शहरातील एका एटीएम मशीनमध्ये पैसे 'लोड' करताना अवलंबिली जाणारी पद्धती दरोडेखोरांना दिशादर्शन करणारी ठरावी इतकी धक्कादायक आहे.
या नियमबाह्य पद्धतीचा अभ्यास करून दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या एटीएम केंद्र लुटले तरी सामान्यजनांच्या ती बाब लक्षातही येणार नाही. नागरिकांनी अत्यंत विश्वासाने बँकेच्या हवाली केलेल्या श्रमाच्या पैशांची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.
सोबतचे छायाचित्र बघा. या एटीएममध्ये याच पद्धतीने पैसे 'लोड' होतात. पैसे 'लोड' करणारी ही मंडळी अधिकृत आहेत.
गुन्हेगारांना आकर्षित करू शकणारा हा प्रकार मंगळवारी अत्यंत वर्दळीच्या रुक्मिणीनगर परिसरातील आहे. दुपारी दीड वाजताच्या सुमारास एटीएम केंद्रासमोर एक कार येऊन धडकली. जणू केंद्र ताब्यात घ्यावे, अशा पद्धतीने ती कार केंद्राला खेटून आडवी लावली गेली.

असा होऊ शकतो धोका!
बँकेत अधिकृत व्यक्तींकडून पैसे लोड करण्यासाठी जी पद्धती अवलंबिण्यात आली तिचा अभ्यास करून दरोडेखोरदेखील दिवसाढवळ्या एटीएम केंद्रातील मशिन्स उघडून त्यातील रक्कम सर्वांदेखत लुटून नेऊ शकतात. बँकेचे कर्मचारी वा त्यांनी नेमलेले अधिकृत लोक ओळखताच येत नसल्याचा गैरफायदा दरोडेखोरही घेऊ शकतात. त्यांनाही कुणी ओळखू शकणार नाहीत. आम्ही बँकेचेच लोक असल्याची बतावणी करून पैसे लुटलेही जाऊ शकतात.

बँकेच्या आवारातील एटीएममध्ये बँक कर्मचारी पैसे भरतात. इतर केंद्रांत पैसे भरण्याची जबाबदारी मात्र खासगी एजन्सीज्ची आहे. अशा तीन एजन्सीज् कार्यरत आहेत. घडलेला प्रकार करारातील नियमांचे उल्लंघन करणारा आहे. या संवेदनशील प्रकाराची चौकशी केलीच जाईल.
- अश्विन चौधरी,
चीफ मॅनेजर, (एटीएम विभाग).

Web Title: It's a guide to the robbers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.