‘तो’ खड्डा ठरतोय जीवघेणा

By Admin | Updated: August 8, 2015 00:22 IST2015-08-08T00:22:22+5:302015-08-08T00:22:22+5:30

स्थानिक महेंद्र कॉलनी ते पांढरी हनुमान मंदिर या मार्गावर भुयारी गटारच्या अर्धवट कामांमुळे खुले असलेले खड्डे हे हल्ली जीवघेणा ठरु लागला आहे.

'It' is a pitfalls, fatal | ‘तो’ खड्डा ठरतोय जीवघेणा

‘तो’ खड्डा ठरतोय जीवघेणा

महेंद्र कॉलनीवासी त्रस्त : महापालिकेला नागरिकांच्या मृत्यूची प्रतीक्षा
अमरावती : स्थानिक महेंद्र कॉलनी ते पांढरी हनुमान मंदिर या मार्गावर भुयारी गटारच्या अर्धवट कामांमुळे खुले असलेले खड्डे हे हल्ली जीवघेणा ठरु लागला आहे. गुरुवारी रात्री एका महिलेला या खड्ड्यातून सुखरुप बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांना यश मिळाले आहे. मात्र हे खड्डे त्वरीत बुजवावे, ही मागणी कायम असताना लोकप्रतिनिधी व अभियंत्यांनी कमालीचे दुर्लक्ष चालविल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहावयास मिळत आहे.
महेंद्र कॉलनी ते पांढरी हनुमान मंदिर हा रस्ता सतत वर्दळीचा असताना रस्त्यालगत मोठमोठ्याले जीवघेणी खड्डे कायम असताना ते बुजविण्याचे सौजन्य संबंधित अभियंत्यांनी दाखविले नाही, असा आरोप नागिरकांचा आहे. या मार्गावर चार ते पाच ठिकाणी भुयारी गटारचे चेंबर असून राजू धावळे यांच्या घरासमोर मोठा खड्डा आहे. या ठिकाणी कोणत्याही क्षणी प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भुयारी गटारचा हा खड्डा पूर्णपणे बुजवावा ही मागणी काही दिवसांपासूनची आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने हा खड्डा असल्याचे दिसून येत नाही. परिणामी रस्त्याने ये -जा करणाऱ्याला जीव कधी गमवावा लागेल, हे सांगणे कठीण आहे. हे चेंबर खाली सुमारे १५ फू ट खोल असून एखादी व्यक्ती या खड्ड्यात पडल्यास ती बाहेर काठणे मुश्लिक होईल, असे भयानक चित्र महेंद्र कॉलनी या परिसरात निर्माण झाले आहे.
खड्ड्याबाबत योजना रेवस्कर, लुबना तनवीर या सदस्यांना अवगत केले आहे. परंतु खड्डा का बर बुजविण्यात आला नाही, हा संशोधनाचा विषय आहे. खड्ड्याची तांत्रिक बाब म्हणून आगरकर नामक अभियंत्यांना देखील कळविले आहे. परंतु आगरकर यांना वेळ मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ज्या भागात हा जीवघेणी खड्डा निर्माण झाला आहे त्या भागात संत गाडगेबाबा विद्यालय असून विद्यार्थ्यांची या मार्गावर सतत वर्दळ आहे. चेंबरला झाकण नसल्यामुळेच खड्ड्याचे स्वरुप आले आहे. भरपावसात या खड्ड्यात वाहन चालक पडल्याशिवाय राहणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे. हा खड्डा त्वरीत बुजविण्यात आला नाही तर अप्रिय घटना घडल्यास प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'It' is a pitfalls, fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.