शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:11 IST

Amravati : वैयक्तिक संबंध, मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही. त्यामुळे संघाच्या कार्यक्रमासंदर्भात आई जो निर्णय घेईल तो मान्य असेल, अशी स्पष्ट भूमिका रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अमरावती महानगराच्या वतीने रविवार, ५ ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची निमंत्रण पत्रिका दारोदारी वाटप केली जात असून, संघाची शताब्दी वर्षपूर्ती साजरी केली जाणार आहे. या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई या प्रमुख अतिथी म्हणून असणार आहेत. मात्र, डॉ. कमलताई गवई यांचे निमंत्रण पत्रिकेवर नाव असल्याने वाद, चर्चा प्रसार माध्यमांसह सोशल मीडियावर जोरात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला कमलताई जाणार की नाहीत, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही, हे विशेषा अमरावतीचे गवई कुटुंब हे आंबेडकरी विचारसरणीचे असल्याचे सर्वश्रुत आहे. 

रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी विचारसरणीवरच रा. सु. गवई यांचे राजकीय, सामाजिक कार्य चालले. तोच वारसा पुढे कमलताई गवई, डॉ. राजेंद्र गवई यांनी चालविला आहे. मात्र, संघाच्या उत्सव सोहळ्यात कमलताई यांना निमंत्रण आल्याने याला वेगवेगळे कंगोरे आले आहेत. याविषयी उलटसुलट चर्चा होत आहे. खरे तर तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हस्तलिखित एक पत्र भूमिकासंदर्भात व्हायरल झाले, ते कमलताईनी लिहिले नाही, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. कमलताईनी संघाचे निमंत्रण स्वीकारले होते, अशी माहिती आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. आता तर संघाची निमंत्रण पत्रिका अमरावतीत अनेक ठिकाणी वाटप होत आहे. त्यामुळे कमलताई या कार्यक्रमाला जातात की नाही? हे रविवारी स्पष्ट होईल.

आई जो निर्णय घेईल तो मान्य असेल: डॉ. राजेंद्र गवई

वैयक्तिक संबंध, मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही. त्यामुळे संघाच्या कार्यक्रमासंदर्भात आई जो निर्णय घेईल तो मान्य असेल, अशी स्पष्ट भूमिका रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी घेतली आहे. दिवंगत रा. सु. गवई यांचे संबंध माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, गंगाधरपंत फडणवीस यांच्याशी होते. पण, कधीही भूमिका, विचारसरणी बदलली नाही. तोच वसा आणि वारसा आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत. आई कमलताई यांच्या निर्णयाशी सुसंगत राहू, असे डॉ. गवई म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Controversy: Judge's mother's name on RSS invite sparks debate.

Web Summary : Kamaltai Gavai's presence as chief guest at an RSS event ignites controversy, given her family's Ambedkarite background. Her son, Rajendra Gavai, supports her decision, emphasizing that personal relationships don't negate ideology.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयAmravatiअमरावती