आॅटोचालकांना गणवेश, बॅच, बिल्ला लावणे अनिवार्य

By Admin | Updated: February 6, 2016 00:17 IST2016-02-06T00:17:58+5:302016-02-06T00:17:58+5:30

शहरातील सर्व आॅटोचालकांना आता गणवेश व बॅच बिल्ला लावणे अनिवार्य करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी दिले.

It is compulsory for automobiles to put uniforms, batches and badges | आॅटोचालकांना गणवेश, बॅच, बिल्ला लावणे अनिवार्य

आॅटोचालकांना गणवेश, बॅच, बिल्ला लावणे अनिवार्य

८ फेब्रुवारीपासून पोलिसांची मोहीम : वाहतूक समिती स्थापन होणार
अमरावती : शहरातील सर्व आॅटोचालकांना आता गणवेश व बॅच बिल्ला लावणे अनिवार्य करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी दिले. ८ फेब्रवारीपासून आॅटोची धरपकड मोहीम सुरू होणार असून यासंदर्भात पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्या आदेशाने वाहतूक समितीची स्थापनासुध्दा करण्यात येणार आहे.
शहरात आॅटो व शहर बसेस सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे सचित्र वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. 'सीपी साहेब यांना आवरा' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच शहरात खळबळ माजली होती. या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्तांनी आॅटो चालकांना गणवेश व बॅच बिल्ला अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधित पोलीस उपायुक्तांना सूचना दिल्या आहेत. ८ फेब्रवारीपासून आॅटोच्या प्रवासी वाहतुकीवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. तत्पूर्वीच पोलिसांनी शहरात फिरून आॅटोचालकांना गणवेश व बॅच बिल्ला लावणे अनिवार्य असल्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी विविध चौकांत उभ्या राहणाऱ्या आॅटो चालकांना जाहीर सुचना देऊन ही बाब कळविली आहे. गणवेश व बॅच बिल्ला लावा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी ताकिद आॅटो चालकांना दिली आहे. जिल्ह्यात १६ हजार ५० तर त्यापैकीच शहरात ५ हजारांच्या जवळपास आॅटो प्रवासी वाहतूक करतात. मात्र, शहरातील काही आॅटो चालक वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करीत शहरात प्रवासी वाहतूक करीत आहे. यासंदर्भात पोलीस विभागाकडून आॅटो चालकांना पूर्वीच निर्देश देण्यात आले होते. यासंदर्भात पोलीस विभागाकडून आरटीओला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र, आॅटो चालकांना वाहतूक नियमांची शिस्त लागावी, त्यांनी प्रवासी वाहतुकीची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळावी, या उद्देशाने पोलीस विभागाने आता आॅटो चालकांना गणवेश व बॅच बिल्ला अनिवार्य केला आहे.

आॅटोचालकांनी गणवेश व बॅच बिल्ला लावणे अनिवार्य आहे. यासंदर्भात त्यांना जाहीर सूचनाही देण्यात आल्या आहेत. ८ फेब्रुवारीनंतर विनागणवेश व विना बॅच बिल्ला असणाऱ्या आॅटोंवर कारवाई करण्यात येईल. नियमभंग करणाऱ्यावर कारवाई होईल.
- नितीन पवार,
पोलीस उपायुक्त.

Web Title: It is compulsory for automobiles to put uniforms, batches and badges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.