शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

पाणीटंचाई आणि अपूर्ण विहिरींचे मुद्दे गाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:25 IST

मग्रारोहयो अंतर्गत सन २०१३-१४ पासून जिल्ह्यात खचलेल्या आणि बुजलेल्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव अद्याप निकाली काढले नाहीत. यासोबतच पाणीटंचाईवर उपाययोजनांच्या मुद्दे गुरूवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत गाजले.

ठळक मुद्देजलव्यवस्थापन समिती : पदाधिकारी संतप्त, प्रशासनाला विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मग्रारोहयो अंतर्गत सन २०१३-१४ पासून जिल्ह्यात खचलेल्या आणि बुजलेल्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव अद्याप निकाली काढले नाहीत. यासोबतच पाणीटंचाईवर उपाययोजनांच्या मुद्दे गुरूवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत गाजले. पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावर कारवाईचे निर्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी दिले.विविध विषयाला अनुसरून अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती बळवंत वानखडे, सुशीला कुकडे, वनिता पाल, सदस्य गौरी देशमुख, पार्वती काठोळे, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, कॅफो रवींद्र येवले, डेप्युटी सीईओ नारायण सानप, सिंचनचे कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, राजेंद्र सावळकर उपस्थित होते. सभेत अपूर्ण सिंचन विहिरी प्रलंबित असल्याचा मुद्दा दत्ता ढोमणे, बळवंत वानखडे, सदस्या गौरी देशमुख यांनी उपस्थित केला. यासंदर्भात डेप्युटी सीईओ सानप यांनी विहिरींचे १,६१८ पैकी ८९३ प्रस्ताव मंजूर आहेत. ३६८ प्रस्ताव त्रुटीमुळे प्रलंबित, तर त्रुटी दूर केलेले मंज़ुरीसाठी १६१ प्रस्ताव आहेत. मात्र, यासाठी मुदतवाढ दिल्यानंतरही कामे झालेली नाहीत. त्यामुळे मुदतवाढीसाठी प्रस्ताव नरेगा आयुक्तांकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणीटंचाई निवारणार्थ १६१ गावांत १२० विंधन विहिरी व कुलनलिका, तात्पुरत्या नळ योजनेची १२, विशेष नळ दुरूस्ती ९ आणि ५८ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले असून २०१ कामे मंजूर आहेत.उपोषणाच्या इशाऱ्यांची दखलअंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोना येथील विंधन विहिरीचे पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करावे व जलशुद्धीकरण यंत्र (आर.ओ प्लॅट) २० फेब्रुवारीपर्यंत न बसविल्यास २१ फेब्रुवारीपासून सभागृहात उपोषणाचा इशारा आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी झेडपी प्रशासनाला दिला होता. याची प्रशासनाने धास्ती घेत वरील दोन्ही मागण्या मंजूर केल्याचे पत्र सभेपूर्वीच सभापतींना देऊन हा तिढा सोडला.

टॅग्स :Waterपाणी