खरिपाच्या मशागतीचा प्रश्न ऐरणीवर

By Admin | Updated: April 28, 2015 00:12 IST2015-04-28T00:12:27+5:302015-04-28T00:12:27+5:30

यावर्षी शेतकऱ्यांनी सौभाग्याचं लेणं गहाण ठेवून तसेच बँकेतून पिककर्ज घेवून पेरणी केली.

The issue of Kharif's paddy field on the anagram | खरिपाच्या मशागतीचा प्रश्न ऐरणीवर

खरिपाच्या मशागतीचा प्रश्न ऐरणीवर

बँकांचा कर्ज देण्यास नकार : अवकाळी पाऊस, गारपिटीने केले हैराण
संजय खासबागे वरूड
यावर्षी शेतकऱ्यांनी सौभाग्याचं लेणं गहाण ठेवून तसेच बँकेतून पिककर्ज घेवून पेरणी केली. मात्र, दोन्ही हंगाम अवकाळी पाऊन आणि गारपीटीने बुडाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आता खरीप हंगामात शेतीची मशागत करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये नसल्याने मशागतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मृगात लावलेली कपाशी, तूर, मिरची सह संत्रा पिकांवर संक्रात आली यामधून शेतकरी सावरत रब्बी हंगामात गहू चन्याची पेरणी केली. मात्र, गारपीट आणि अवकाळी पावसाने तोंडचा घास गेल्याने आर्थिक समस्या निर्माण झाल्याने बँकासह सावकारांच्या कर्जाचा भरणा कसा करावा हा प्रश्न निर्माण झाल्याने खरीपाच्या मशागतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वरुड तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ७४ हजार २२३ हेक्टर ६१ आर असून महसूली गावांची संख्या १४० आहे. यापैकी १०० आबाद तर ४० उजाड गांवे आहे. तालुक्याची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार २ लाख २४ हजार ७१६ एवढी आहे. लागवडीखालील क्षेत्र ५१ हजार हेक्टर तर सिंचनाखाली क्षेत्रफळ २३ हजार ६५६ हेक्टर आहे. एकूण खातेदारांची संख्या ३९ हजार ६५६ असून सात राजस्व मंडळ आहे. भूमिहीन मजुरांची संख्या ४२ हजार ३२ असल्याचे नमूद आहे. तालुक्यातील प्रमुख पिके कापूस, सोयाबिन, तुर, ज्वारी, हळद, मिरची तसेच संत्रा आहे. खरीप हंगामामध्ये कपाशी, मिरची, सोयाबिन आणि ज्वारी ची पेरणी केल्या जाते. दरवर्षीच्या तुलनेत गतवर्षी पावसाने दडी मारली होती . उशिरा पेरणी झाल्योन याचा थेट परिणाम उतपदनावर पडला. कपाशीचे अजित बियाण्याचा आणि डी.ए.पी. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन शेतकऱ्यांची लूटच झाली. याकडे कृषि विभागाने डोळेझाक पणा केल्याने शेतकऱ्यांना अधिक रक्कम देवून बि बियाणे, खते खरेदी करावे लागले. तर वाढत्या तक्रारी पाहून पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांची बाजू घेत आगाउ किंमतीने कृषि माल विकतांना आढळल्यास दुकानदारांविरुध्द कार्यवाही करण्याचा फतवा जारी केला होता. शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मिरची वर बोकडया रोग गेल्याने संपूणर् मिरचीचे पिक बुडाले. कपाशीवर लाल्याचा प्रादुभावाने कापूस गेला. तूर तर काही प्रमाणात ज्वारी चे पिक हाती आले. सोयाबीनचे पीक मातीतच विरले. खरिपाची पिके हातातून गेल्यावर रबी पिकाची पेरणी केली मात्र यातही अवकाळी वादळी पाउस आणि गारपिटीने गव्हासह चण्याचे मोठे नुकसान झाले. सतत निसर्गाची अवकृपा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला तर पुन्हा कर्जबाजारी होऊन खासगी सावकाराच्या दारात जावे लागले. ३ ते ४ टक्के मासिक व्याजाने तर काहींनी सौभाग्याचे लेणं गहान ठेवून शेती केली. मात्र यातही अपयश आले. गरिबाला बँक व कोणतेही इतर माणूस त्यांचे अडले नडले काम करण्यास पैसे देत नाही़ त्यामुळे हा गरिब दर महिण्याचे राशनचे धान्य विकून किंवा राशन कार्ड गहाण ठेवून आपली उपजीविका कशी तरी भागवतो़ अशी शेतकरी-शेतमजुरांची शोकांतिका आहे.
यामुळे व्यापारी आणि नोकरदार वर्ग मस्त आहे तर शेतकरी शेतमजूर मरणासन्न अवस्थेला पोहचला असल्याने अनेक खासगी सावकारांनी गहाणातील जमिनीवर ताबा मिळविल्याचे अनेक उदाहरणे आणि अनेकांनी बॅकाचे घेतलेले कोरे धनादेश बॅकांमध्ये वटविण्यास टाकून अनादरीत झालेल्या धनादेशाचे प्रकरणे न्यायप्रविष्ट केले आहे.

मशागतीची सोय नाही, पेरणीचे काय?
मृगाच्या पावसासाठी एक महिन्याचा अवधी असतंना अजूनही मगशातीला सुरुवात झाली नाही. कर्ज मिळत नसल्याने शेती कशी करावी, हा यक्ष प्रश्न आहे. मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न असल्याने कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. जून महिन्यात मृग नक्षत्र सुरु होते. एप्रिलमध्ये मशागत करुन पेरणीसाठी जमिन सज्ज ठेवावी लागते. परंतु एक महिन्याचा अवधी असताना जमिनीत नांगर, वखर गेला नाही. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने शेतीची कामे प्रलंबित आहेत. काही शेतकऱ्यांचा लागवड खर्चसुध्दा निघणे कठीण झाल्याने पेरणीची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

Web Title: The issue of Kharif's paddy field on the anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.