शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

झाडा येथील शेतकरीपुत्र 'इस्रो'त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 5:00 AM

वैभवने २०१८ साली धामणगावच्या शासकीय आयटीआयमधून ‘आयसीटीएसएम’ (इन्फर्मेशन अ‍ॅन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी - सिस्टीम मेंटेनन्स) अभ्यासक्रम उत्तीर्ण केला. मुंबई दूरदर्शन केंद्रात त्याने अप्रेंटिस कालावधी पूर्ण केला. त्या कालावधीत इस्रो आणि डीआरडीओ अशा संरक्षण-माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च शासकीय संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, याबाबत त्याने प्रयत्न सुरू केले.

ठळक मुद्देतंत्रज्ञ म्हणून निवड । धामणगाव आयटीआयच्या विद्यार्थ्याची झेप

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : आदर्श ग्राम झाडा येथील एका शेतकरीपुत्राची बंगळुरु स्थित भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (इस्रो) मध्ये निवड झाली आहे. तो धामणगाव रेल्वे येथील आयटीआयचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्या निवडीने विद्यानगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. वैभव दिलीप खैरकार असे या शेतकरीपुत्राचे नाव आहे.ग्रामस्वच्छता अभियानासाठी ३०० हून अधिक पारितोषिक पटकावणाऱ्या झाडा या गावातील शेतकरी दिलीप खैरकार यांना दोन मुले. मोठा मुलगा सैन्यात कामगिरी बजावत आहे. वैभव हा धाकटा. शेतीत राबायचे, पण मुलांना शिकून मोठे करायचे, अशी जिद्द बाळगून त्यांनी मुलांना घडविले.वैभवने २०१८ साली धामणगावच्या शासकीय आयटीआयमधून ‘आयसीटीएसएम’ (इन्फर्मेशन अ‍ॅन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी - सिस्टीम मेंटेनन्स) अभ्यासक्रम उत्तीर्ण केला. मुंबई दूरदर्शन केंद्रात त्याने अप्रेंटिस कालावधी पूर्ण केला. त्या कालावधीत इस्रो आणि डीआरडीओ अशा संरक्षण-माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च शासकीय संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, याबाबत त्याने प्रयत्न सुरू केले.डॉ. वसंत गोवारीकर यांनी ज्या संस्थेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली, त्या इस्रोमध्ये निवड होण्यासाठी अनेक जण तयारी करीत असतात. त्यामुळे वैभवने परीक्षा, अर्ज भरणे सुरू केले. निवडीची प्रक्रिया व कामाच्या स्वरूपाबाबत सखोल अध्ययन केले. अखेर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला.भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत येथे टेक्निशियन या पदाकरिता देशातील केवळ तीन उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यापैकी झाडा येथील वैभव खैरकार हा एक ठरला आहे. याबद्दल धामणगाव येथील आयटीआयचे प्राचार्य राजेश शेळके यांनी वैभवचा सत्कार केला.जिद्द, चिकाटी व मेहनतीने यश मिळू शकते. माझे जन्मदाते व आयटीआयचे प्राचार्य, प्राध्यापकांचा माझ्या यशात सर्वात मोठा वाटा आहे.- वैभव खैरकार

टॅग्स :isroइस्रो