कारच्या धडकेत इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:13 IST2021-03-15T04:13:36+5:302021-03-15T04:13:36+5:30

अमरावती: कामानिमित्त जात असलेल्या इसमाला कारने जबर धडक दिल्याने, इसमाचा मृत्यू झाल्याची घटना राजापेठ चौकातील श्रीराम ट्रॅव्हल्ससमोर शनिवारी घडली. ...

Isma dies in car crash | कारच्या धडकेत इसमाचा मृत्यू

कारच्या धडकेत इसमाचा मृत्यू

अमरावती: कामानिमित्त जात असलेल्या इसमाला कारने जबर धडक दिल्याने, इसमाचा मृत्यू झाल्याची घटना राजापेठ चौकातील श्रीराम ट्रॅव्हल्ससमोर शनिवारी घडली.

संजय महादेव पेढेकर (५२, रा. सुशीलनगर) असे मृताचे नाव आहे. या संदर्भात त्यांचे भाऊ फिर्यादी गजानन साहेबराव पेढेकर (४५, रा. पार्वती नगर) यांनी राजापेठ पोलिसात या प्रकरणी तक्रार नोंदविली. तक्रारीवरून एमएच ०१सीजे ४७९३चा कारचालक सात्विक संतोषराव विधळे (२५, रा. महालक्ष्मीनगर) याच्याविरुद्ध भादंविची कलम २७९, ३०४(अ) अन्यवे गुन्हा नोंदविला आहे. मृतक व फिर्यादी यांचे राजापेठ चौकात लाँड्रीचे दुकान आहे. यातील फिर्यादी यांचा भाऊ काही कामानिमित्त जात असताना, यातील कार चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून मृताला धडक दिली. इसमाला तातडीने इर्विन रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Isma dies in car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.