काळगव्हाण येथे इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:38+5:302021-04-05T04:12:38+5:30
वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काळगव्हाण येथील सुधाकर तुळशिराम सोनटक्के (५५) यांनी रविवारी सकाळी गळफास घेऊन ...

काळगव्हाण येथे इसमाची आत्महत्या
वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काळगव्हाण येथील सुधाकर तुळशिराम सोनटक्के (५५) यांनी रविवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्थानिक पोलीस पाटील यांनी रहिमापुर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. ठाणेदार सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दुधराम चव्हाण,रवींद्र निंबाळकर यांनी पंचनामा केला.
सुधाकर सोनटक्के यांनी आपल्या घराच्या बाजूला असलेल्या गायवाड्यात लोखंडी अँगलला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतल्याचे लक्षात आले. मृतकाच्या डाव्या हातावर शारिरीक त्रासामुळे आत्महत्या करीत आहे लिहिलेले आढळून आले. मृतापृश्चात दोन मुले असून ते पुणे येथे उच्चशिक्षण घेत आहेत. प्रथम पत्नी वारल्यावर सोनटक्के यांनी दुसरे लग्न केले होते. परंतु तीही क्षयरोगाने दगावल्याने सुधाकर हे मानसिकरित्या खचल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.