येणस ग्रामपंचायतमध्ये दोन जागांसाठी ईश्वरचिट्ठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:47+5:302021-01-19T04:16:47+5:30
चार ग्रामपंचायती अविरोध : नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चार ग्रामपंचायती अविरोध झाल्या. यात पिंप्री निपाणी, सातरगाव, ...

येणस ग्रामपंचायतमध्ये दोन जागांसाठी ईश्वरचिट्ठी
चार ग्रामपंचायती अविरोध :
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चार ग्रामपंचायती अविरोध झाल्या. यात पिंप्री निपाणी, सातरगाव, नांदसावंगी, कंझरा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. उर्वरित ४७ ग्रामपंचायतीमधील २६ सदस्य अविरोध झाले आहेत.
येणस ग्रामपंचायतमधील प्रभाग २ मधील स्वाती देशमुख व नितीन महल्ले यांना प्रत्येकी २२६ अशी समान मते मिळाली तसेच विशाखा बनसोड व अमिता लोणारे यांना प्रत्येकी २२३ मते मिळाली. या दोन जागांसाठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात येऊन ईश्वर चिठ्ठीने नितीन महल्ले व अमिता लोणारे विजयी झाले. तालुक्यातील मोखड ग्रामपंचायतमध्ये सातपैकी सात व गटग्रामपंचायत खानापूर येथे संपूर्ण नऊ जागा काँग्रेसप्रणीत पॅनेलने पटकाविल्या. वाघोडा ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस व कम्युनिस्ट युतीच्या पॅनेलने बाजी मारली. वाढोणा रामनाथ येथे मात्र प्रस्थापितांना हादरा बसला. मंगरूळ चव्हाळा ग्रामपंचायतीमधील ११ सदस्यांपैकी काँग्रेस-शिवसेना आघाडीच्या पॅनेलने दहा जागा पटकावल्या. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून विजय साजरा केला.
-------------------