तुम्ही पिता ते पाणी शुद्ध आहे काय? जिल्ह्यात ५९८ ठिकाणी दुषित पाणी

By जितेंद्र दखने | Published: April 9, 2024 10:16 PM2024-04-09T22:16:55+5:302024-04-09T22:17:06+5:30

जिल्हा परिषद : पाणी नमून्याची केली तपासणी

Is the water you drink clean? Contaminated water in 598 places in the district | तुम्ही पिता ते पाणी शुद्ध आहे काय? जिल्ह्यात ५९८ ठिकाणी दुषित पाणी

तुम्ही पिता ते पाणी शुद्ध आहे काय? जिल्ह्यात ५९८ ठिकाणी दुषित पाणी

अमरावती:जिल्ह्यात पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून देण्यात जलस्त्रोतातील पाणी नमून्याची तपासणी केली जाते. गत एप्रित ते फेब्रुवारी या दरम्यान जिल्हाभरातील १५२३ गावांतील १९ हजार १२४ पाणी नमूने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ५९८ पाणी नमूने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे जलस्त्राेताचे पाणी शुध्द करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना केल्या जात आहे.

प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात १६८७ गावे,८३९ ग्रामपंचायतीमध्ये आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत १५२३ गावातील पाणी नमूने घेण्यात आले होते. या पाणी नमून्याची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या दरम्यान जिल्ह्यातील १९ हजार १२४ पाणी नमूने तपासणीसाठी घेतले होते.पाणी नमूने तपासणीत ५९८ ठिकाणचे पाणी नमूने दुषित आढळून आले आहेत. जलस्त्रोतांचे पाणी पिण्या योग्य नसल्यामुळे या जलस्त्रोतातील पाणी शुध्दीकरण करणासाठीची प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश पाणी नमूने तपासणीचा अहवाल येताच जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पंचायत समिती मार्फत संबंधित ग्रामपंचायींना दिलेत.

तालुकानिहाय दुषित पाणी नमूने संख्या
अमरावती ७६,अंजनगाव सुर्जी १४,अचलपुर १३,चांदुर रेल्वे १५,धामणगाव रेल्वे ७८,चांदुर बाजार १२,तिवसा ८०,दर्यापुर ०५,नांदगाव खंडेश्वर १९,वरुड़ ५५,माेर्शी १०६,भातकुली ५०,चिखलदरा ६९,धारणी ०६
एकूण ५९८

दर्यापूर तालुक्यात सर्वात कमी पाणी नमूने दुषित
जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील २१२४ जलस्त्रोतातील पाणी नमूने घेण्यात आले होते. यापैकी १०६ पाणी नमूने दुषित आढळून आले आहेत. तर दर्यापूर तालुक्यात ६६९ पाणी नमूने तपासणीसाठी घेतले होते.यापैकी केवळ ५ ठिकाणचे पाणी नमूने दुषित आढळून आलेत.जिल्ह्यात या ठिकाणी तपासणीत सर्वाधिक कमी पाणी नमूने दुषित आढळून आले आहेत. तर धारणी तालुक्यात २१९२ पाणी नमूने तपासणीकरीता घेतले होते. यापैकी ६ ठिकाणीच पाणी नमूने दुषित असल्यात तपासणीत आढळून आले.

Web Title: Is the water you drink clean? Contaminated water in 598 places in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.