‘इर्विन टू जेल’ टेलिमेडिसिन सुविधा

By Admin | Updated: June 16, 2017 00:08 IST2017-06-16T00:08:18+5:302017-06-16T00:08:18+5:30

येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’द्वारे टेलिमेडिसीन आरोग्य सेवा मिळणार आहे. ‘

'Irwin Two Gel' telemedicine facility | ‘इर्विन टू जेल’ टेलिमेडिसिन सुविधा

‘इर्विन टू जेल’ टेलिमेडिसिन सुविधा

अमरावती कारागृहाचा उपक्रम : ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ ने उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’द्वारे टेलिमेडिसीन आरोग्य सेवा मिळणार आहे. ‘ईर्विन टू जेल’ टेलिमेडिसीन सेवा हा अभिनव उपक्रम मंगळवारपासून सुरू झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक राऊत उपस्थित होते.
पाषाण भिंतीच्या आतील बंद्यांना न्यायालय, रूग्णालय अथवा अन्य कारणास्तव बाहेर आणताना पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. बरेचदा पोलिसांना हुलकावणी देत कैदी पळून जातात. त्यामुळे गृहविभागाने सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहातच ‘व्हिडीओ कॉन्फरसिंग’द्वारे कैद्यांना टेलिमेडिसिन आरोग्यसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कैद्यांची प्रकृती अचानक बिघडल्यास वाहन अथवा सुरक्षा रक्षकांअभावी त्या कैद्यांवर वेळीच उपचार होत नाहीत. परिणामी कैदी दगावल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत.
सद्यस्थितीत कारागृहात ११५० कैदी बंदिस्त आहेत. यातील बरेच कैदी दुर्धर आजाराने ग्रासले आहेत. काहींना क्षयरोग, किडनीचे आजार, सिकलसेल, उच्च रक्तदाब, एडस्ची बाधा झाली आहे. टेलिमेडिसिन आरोग्यसेवेमुळे वेळेची बचत तसेच सुरक्षेसुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारागृहातच उपचारसुविधा दिली जाईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी थेट कैद्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगने संवाद साधून उपचार करतील. कैद्यांना आजाराच्या लक्षणाबाबत विचारणा करून कारागृहातच औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मध्यवर्ती कारागृहात रुग्णालय असले तरी येथे असलेल्या सोयी तोकड्या आहेत. त्यामुळे टेलिमेडिसिन या आरोग्यसेवेमुळे कैद्यांना आता व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे जिल्हा शल्य चिकित्सकांसोबत थेट संवाद साधून आरोग्याविषयक समस्या मांडता येतील. या अभिनव उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी गणोरकर, महिला तुरुंगाधिकारी ज्योती आठवले, तुरूंगाधिकारी राजेंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.

Web Title: 'Irwin Two Gel' telemedicine facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.