इर्विनमध्ये डॉक्टरला मारहाण

By Admin | Updated: December 24, 2014 22:51 IST2014-12-24T22:51:46+5:302014-12-24T22:51:46+5:30

विष प्राशन केलेल्या अवस्थेत इर्विनमध्ये दाखल झालेल्या चेतना मनोज राऊत (३०,सालोरा खुर्द) या महिलेचा मंगळवारी सायंकाळी ४ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी

In Irwin doctors beat up | इर्विनमध्ये डॉक्टरला मारहाण

इर्विनमध्ये डॉक्टरला मारहाण

प्रकरण पोहोचले पोलीस ठाण्यात : महिलेच्या मृत्यूचे तीव्र पडसाद
अमरावती : विष प्राशन केलेल्या अवस्थेत इर्विनमध्ये दाखल झालेल्या चेतना मनोज राऊत (३०,सालोरा खुर्द) या महिलेचा मंगळवारी सायंकाळी ४ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप करुन मारहाण केली. यामुळे इर्विनमध्ये पुन्हा एकदा गोंधळ उडाला.
सालोरा खुर्द येथील रहिवासी चेतना राऊत यांनी चुकीने विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांना उलट्या सुरु झाल्या होत्या. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना दुपारी २.३० वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चेतना यांचा मृत्यू झाला. यावेळी उपचार करणारा डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याने उपचारात हयगय केल्याचा आरोप नातलगांनी केला. त्यानंतर महिलेच्या नातलगांनी डॉक्टरला मारहाणदेखील केली.
डॉक्टरची वैद्यकीय तपासणी
मृतांचे नातेवाईक संदीप राऊत यांनी तत्काळ शहर कोतवाली पोलिसांना या घटनेची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेहाला शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आल्यावर इर्विन परिसरात मृतांचे अन्य नातेवाईकांची गर्दी जमली होती. दरम्यान रात्री १० वाजताच्या सुमारास डॉक्टर चंद्रशेखर आरोग्य सेवा देऊन घरी जाण्यासाठी निघत असतानाच मृताच्या नातेवाईकांनी पुन्हा त्यांना घेराव घालून हलगर्जीपणाचा जाब विचारला. यावेळी वादात नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना कळताच तत्काळ पोलीस ताफा इर्विन परिसरात दाखल झाला. या घटनेची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांना कळताच त्यांनीही तत्काळ पाचारण केले. डॉक्टरांचे मेडिकल करण्यात यावे, अशी मागणी नातेवाईकांनी केल्याने पोलिसानी इर्विनमध्ये डॉक्टरची वैद्यकीय तपासणी करुन घेतली. रात्री उशिरापर्यंत हा वादविवाद सुरु होता. या घटनेत अद्यापपर्यंत तक्रार नोंदविण्यात आली नाही.

Web Title: In Irwin doctors beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.