मुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्वसंध्येला इर्विन मार्ग पाण्याने धुतला

By Admin | Updated: May 29, 2016 00:17 IST2016-05-29T00:17:39+5:302016-05-29T00:17:39+5:30

विभागीय महारोजगार मेळाव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्र्यासह व केंद्रीय राज्यमंत्री येणार असल्याने शुक्रवारी सांयकाळी उशीरा पंचवटी ते इर्विन चौक...

The Irvine route washed with water on the eve of the Chief Minister's tour | मुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्वसंध्येला इर्विन मार्ग पाण्याने धुतला

मुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्वसंध्येला इर्विन मार्ग पाण्याने धुतला

टंचाईत पाण्याची नासाडी : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश
अमरावती : विभागीय महारोजगार मेळाव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्र्यासह व केंद्रीय राज्यमंत्री येणार असल्याने शुक्रवारी सांयकाळी उशीरा पंचवटी ते इर्विन चौक हा टँकरच्या पाण्याने धुण्यात आला या प्रकाराची चौकशी करुन कारवाईने आदेश जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात दुष्काळी स्थिती व पाण्याची भीषण टंचाई असताना शुक्रवारी सायंकाळी उशिरा पंचवटी ते इर्विनपर्यंतच्या मार्गाला टँकरच्या पाण्याने धुण्यात आला. ही पाण्याची नासाडी असल्याने नागरिकांनी याविषयी तीव्र संताप व्यक्त केला. याविषयीच तक्रार जिल्हाधिकारी करण्यात आली. डांबरीकरणाचा मार्ग धुण्याचे आदेश कोणी दिले. याविषयी संदिग्धता आहे. विभागीय महारोजगार मेळाव्याच्या आयोजकासह महापालिकेने याविषयी हातवर केले आहे. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर फिरत असलेल्या या चित्रफितीत टँकर हा डांबरीकरणाच्या मार्गावर पाणी टाकत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणी चौकशीचे व कारवाईचे आदेश दिले आहेत.(प्रतिनिधी)

आयोजकासह महापालिकेला या विषयी विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी टॅकर सांगितला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हा प्रकार कोणी केला याची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. सदर टॅकरचा क्रमांक आरटीओंनी मिळविला असून रात्रीपर्यंत त्या टँकरवर कारवाई करण्यात येणार आहे.
- किरण गीत्ते
जिल्हाधिकारी

Web Title: The Irvine route washed with water on the eve of the Chief Minister's tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.