इर्विन चौकात पुन्हा धम्माल गल्ली!
By Admin | Updated: May 10, 2015 00:34 IST2015-05-10T00:34:30+5:302015-05-10T00:34:30+5:30
आबालवृध्दांच्या मनोरंजनासाठी ‘लोकमत’ ने साकारलेली आगळीवेगळी ‘धम्माल गल्ली’ची संकल्पना ...

इर्विन चौकात पुन्हा धम्माल गल्ली!
या, खेळा, आनंद लुटा : पारंपरिक खेळ, स्पर्धा, अन्य कार्यक्रमांची रंगत
अमरावती : आबालवृध्दांच्या मनोरंजनासाठी ‘लोकमत’ ने साकारलेली आगळीवेगळी ‘धम्माल गल्ली’ची संकल्पना रविवार १० मे रोजी पुन्हा एकदा इर्विन चौक ते गर्ल्स हायस्कूलपर्यंतच्या मार्गावर आपण अनुभवता येणार आहे.
रविवारी सकाळी ६.३० वाजता आयोजित ‘लोकमत’च्या या आनंदोत्सवात सहकुटुंब सहभागी व्हा. यात अडगळीत लपलेली बासरी शोधून, सायकल, स्केट्सवरचीी धूळ झटकून, आजोबांच्या हाती काठी देऊन बच्चे कंपनीला सामील होता येईल. यावेळी झुम्बा, सायकलिंग, स्केटिंग, आर्चरी, कुस्ती, मल्लखांब, जिम्नास्टिक, दोरीवरच्या उड्या, बॅडमिंटन, कॅरम, चेस, रस्सीखेच, लेझिम, शारीरिक कवायती, गिटार, तबला, भजन, भारूड, पारंपारिक वेषभूषा असे बरेच काही अनुभवता येईल. चला तर मग ‘धम्माल गल्ली’ची धम्माल अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा भेटू या इर्विन चौक ते गर्व्हमेंट गर्ल्स हायस्कूल मार्गावर सकाळी ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत.
ही आहेत वैशिष्ट्ये
‘धम्माल गल्ली’ ही संकल्पनाच मूळात आगळी आहे. हा उपक्रम एखाद्या विशिष्ट वयोगटासाठी अथवा पुरूष किंवा महिलांसाठी विभागलेला नाही. यात आबालवृध्द सहभागी होऊ शकतात. इतकेच नव्हे तर आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शनही करू शकतात. सोबतच येथे सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लांबून आस्वादही घेऊ शकतात. आजी,आजोबा, आई-बाबा, काका-काकू आणि इतर आप्तेष्टांसह मित्र-मैत्रिणी एकत्रितपणे या कार्यक्रमात धम्माल करू शकणार आहेत.
अधिक माहितीसाठी
संपर्क क्रमांक -९९२२४२७७९४, ९९२२४४२०५८