इर्विनमध्ये महिन्याकाठी २00 ऑक्सिजन सिलिंडर

By Admin | Updated: June 9, 2014 23:22 IST2014-06-09T23:22:50+5:302014-06-09T23:22:50+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना महिन्याकाठी २00 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासते. याकरिता प्रशासनाकडून वर्षाकाठी ४५ हजारांचा खर्च केला जातो. परंतु रूग्णालयातील ढेपाळलेल्या

In Irvine 200 oxygen cylinders per month | इर्विनमध्ये महिन्याकाठी २00 ऑक्सिजन सिलिंडर

इर्विनमध्ये महिन्याकाठी २00 ऑक्सिजन सिलिंडर

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना  महिन्याकाठी   २00 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासते. याकरिता  प्रशासनाकडून वर्षाकाठी ४५ हजारांचा खर्च केला जातो. परंतु रूग्णालयातील ढेपाळलेल्या सेवेमुळे गरजू रूग्णांपर्यंत ही सेवा पोहचत नसल्याची ओरड आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दरदिवसाला ४00 ते ५00 रुग्ण उपचाराकरिता येतात. त्यापैकी १00 च्या जवळपास रुग्णांना दाखल करून घेतले जाते. जानेवारी ते मे २0१४ पर्यंत १५ हजार रुग्ण उपचाराकरिता रुग्णालयात दाखल होते. त्यापैकी १३ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. रुग्णांच्या वाढत्या ओघाच्या  रुग्णांना दिल्या जाणार्‍या सोई अपुर्‍या पडत आहेत. काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे विविध रोगांनी बाधित रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे.
अपघातांचे प्रमाणही वाढत चालले असून दररोज अनेक अपघातग्रस्त इर्विनमध्ये उपचारासाठी दाखल होतात.
अपघातग्रस्त रूग्णांपैकी काही अत्यवस्थ रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. त्यासाठी दर महिन्याला ऑक्सिजनचे २00 सिलिंडर लागतात. आयसीयू, ओपीडी व सर्व वॉर्डांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्याकरिता पाईपलाईन टाकण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णाच्या बिछान्याजवळ ऑक्सिजनची जोडणी देण्यात आल्याने अतिदक्षतेची गरज असणार्‍या रुग्णांना लगेच ऑक्सिजनचा पुरवठा करता येतो. 
दररोज शेकडो रुग्णांना  ऑक्सिजनची गरज भासते. १ क्युबिक एमएमचे ऑक्सिजन सिलिंडर १३0 रुपये, १.५ क्युबिक एमएमचे १४0 रूपये तर ७ क्युबिक एमएमचे सिलिंडर ३६0 रुपयांत विकत घेतले जाते. वर्षभरात ४५ हजारांचा खर्च जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला ऑक्सिजनसाठी करावा लागत आहे. परंतु रूग्णालय व्यवस्थापनच ढेपाळल्याने रूग्णांचे हाल होतात.  (प्रतिनिधी)

Web Title: In Irvine 200 oxygen cylinders per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.