सिंचन व्यवस्थेतील पाईपलाईन निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST2020-03-09T05:00:00+5:302020-03-09T05:00:09+5:30

वरूड तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी असून, या भागात पाणीवापर संस्थासुद्धा आहेत. सिंचन प्रकल्पातून पाणी उपलब्ध झाल्याने परिसरातील शेती बागायती झाली. मात्र, पाटसऱ्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याने पाइपलाइनव्दारे पाणीपुरवठा करण्याची योजना आणण्यात आली. नागठाणा-२ प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी देऊन सन २०१५ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

Irrigation system pipeline degraded | सिंचन व्यवस्थेतील पाईपलाईन निकृष्ट

सिंचन व्यवस्थेतील पाईपलाईन निकृष्ट

ठळक मुद्देचुडामणी पाणीवापर संस्थेची तक्रार : नागठाणा प्रकल्पातून पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तालुक्यातील नागठाणा-२ प्रकल्पावरून कृषी सिंचनाकरिता गुरुत्वाकर्षण पद्धतीने सिंचनाकरिता पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये वापरलेले पाईप निकृष्ट दर्जाचे असून, काळे पडू लागले आहेत. त्याअनुषंगाने चुडामणी पाणीवापर संस्थेने सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वरूड तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी असून, या भागात पाणीवापर संस्थासुद्धा आहेत. सिंचन प्रकल्पातून पाणी उपलब्ध झाल्याने परिसरातील शेती बागायती झाली. मात्र, पाटसऱ्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याने पाइपलाइनव्दारे पाणीपुरवठा करण्याची योजना आणण्यात आली. नागठाणा-२ प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी देऊन सन २०१५ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
सदर काम चार वर्षांपासून सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराने वापरलेले पाईप हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने ते पिवळे, काळे पडायला सुरुवात झाली आहे. याबाबत सिंचन विभागाकडे पाणी वापर संस्थेने तक्रारी केल्यात. परंतु, अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.

सिंचनाची पाईपलाईन भविष्यात टिकाऊ राहावी आणि कमी खर्चात अधिक सिंचन व्हावे, यासाठी उत्कृष्ट दर्जाचे पाइप वापरणे गरजेचे आहे. पाईपलाईन सुरू होण्यापूर्वीच ते लाल, पिवळे, काळे पडू लागले. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी.
- विवेक फुटाणे,
अध्यक्ष, चुडामणी पाणीवापर संस्था

निकृष्ट पाईप वापरले जात असल्याने सदर पाईपलाईन टिकणार नाही. चांगल्या प्र्रतीचे पाईप वापरण्यात यावे. या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पातून मिळणाºया पाण्याचा लाभ व्हावा.
- अतुल काळे,
शेतकरी, शेंदूरजनाघाट

Web Title: Irrigation system pipeline degraded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.