सिंंचन प्रकल्पात केवळ मृतसाठा
By Admin | Updated: June 4, 2017 00:10 IST2017-06-04T00:10:14+5:302017-06-04T00:10:14+5:30
तालुक्यातील ९ प्रकल्पांत यावर्षी १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. मात्र पाण्याचा आगाऊ वापर झाल्यामुळे ..

सिंंचन प्रकल्पात केवळ मृतसाठा
बागायतदार संकटात : ७ कोरडे, पुसली १९, वाई प्र्रकल्पात १५ टक्के साठा
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तालुक्यातील ९ प्रकल्पांत यावर्षी १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. मात्र पाण्याचा आगाऊ वापर झाल्यामुळे व यंदा उन्हाची तीव्रता मार्च महिन्यापासूनच वाढल्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील सात प्रकल्प कोरडे पडले आहेत. पुसली १९ टक्के आणि वाई प्रकल्पात १५ टक्के आणि जामगाव प्रकल्पात ५ टक्के जलसाठी शिल्लक आहे.
वरूड सिंंचन व्यवस्थापन शाखेच्या कक्षेत येत असलेल्या सिंंचन प्रकल्पाची ओलीतक्षमता ५ हजार १५५ हेक्टरची असून सिंंचनक्षेत्र २ हजार ३५० हेक्टर ओलीतक्षेत्र आहे. पंरतु २०१६ आॅगस्टमध्ये सर्व प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होता. नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने आणि तापमानात गतीने वाढ झाल्याने जलसाठा वेगाने कमी होऊन मे महिन्यात सिंचन प्रकल्प कोरडे, तर काही प्रकल्पांमध्ये मृतसाठा शिल्लक राहिला आहे.
शेकदरी, सातनूर, पंढरी, नागठाणा, जमालपूर, बेलसावंगी, लोणी धवलगिरी प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले. यामुळे सिंचनाच्या प्रश्नासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील १४ पाणी वापर संस्था असून रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणी वापर संस्थांना पाणी द्यावे लागते, तर नद्यांना सुद्धा पाणी सोडण्याची वेळ आली आहे. कपिलेश्वर पाणी वापर संस्था वगळता इतर संस्थाना पाणी वाटप बंद करण्यात आले.
तालुकयात सिंचनाकरिता भरपूर पाणी उपसा केला जातो. अतिविकसित क्षेत्र असल्याने उपसा अधिक आहे. पावसाचे पाणी, भूगर्भात जिरणारे पाणी आणि उपसा होणारे पाणी यामध्ये समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.
- डी.एम.सोनारे,
शाखा अभियंता, शेकदरी विभाग