पाटबंधारे विभागाचा भ्रष्टाचार

By Admin | Updated: June 30, 2015 00:29 IST2015-06-30T00:29:57+5:302015-06-30T00:29:57+5:30

तालुक्यात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाअंतर्गत लघु तलावाचे काम सुरु आहे.

Irrigation Department's corruption | पाटबंधारे विभागाचा भ्रष्टाचार

पाटबंधारे विभागाचा भ्रष्टाचार

कामापूर्वीच देयक काढले : अखेर चौकशीला प्रारंभ
वरूड : तालुक्यात जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाअंतर्गत लघु तलावाचे काम सुरु आहे. परंतु सदर तलावाची थातूरमातूर कामे करुन लाखो रुपयांची देयके काढण्याचा सपाटा लघु सिंचन विभागाने सुरु केला आहे. याबाबत युवक काँग्रेसचे अध्यक्ष व जि.प.सदस्य विक्रम ठाकरे यांनी लघु सिंचन पाटबंधारे विभागाला माहितीमधून हा प्रकार उघडकीस आला. भ्रष्टाचाराचे बिंग फुटणार म्हणून येथील अभियंत्याने तातडीने भिंत बांधण्याचे फर्मान सोडून ठेकेदाराकडून भिंत बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र युवक काँग्रेसच्या आंदोलनामुळे तो प्रयत्न फसला.
कार्यकारी अभियंता कुळकणी तसेच सहभागी कनिष्ठ अभियंता, ठेकेदार यांच्यावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष असले तरी उपविभागीय अभियंत्यांचे पाप कनिष्ठ अभियंत्याच्या पथ्थ्यावर तर पडणार नाही ना, अशी चर्चा परसिरात आहे. याप्रकरणी जि.प.सदस्य विक्रम ठाकरे आणि विजय श्रीराव यांनी जि.प.अध्यक्ष सतीश उईके यांना निवेदन दिले. अध्यक्षांनी मुख्यकार्यपालन अधिकाऱ्याला निवदेन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
वरुड तालुक्यातील पिंपळखुटा याशिवारामध्ये लघु सिंचन तलाव दुरूस्तीचे काम मंजूर होते. सदर काम जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाकडे असल्याने तलाव दुरूस्तीकरिता २२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तलाव दुरूस्तीच्या कामाचे देयक मार्च २०१५ मध्ये काढण्यात आले. काम न करताच देयके काढण्याचा प्रताप अभियंत्याने केला. यामध्ये ठेकेदार आणि अंभियत्याचे साइेलोटे असल्याने केवळ शासनाच्या निधीचा अपव्यवय आणि नागरिकांच्या सुविधांचा बट्ट्याबोळ करणे हाच उद्देश असल्याचे स्पष्ट होते. कामाचे इस्टिमेट तयार करताना ज्या ठिकाणी या तलाव दुरूस्तीचे काम करावयाचे आहे तेथून मिर्झापूर गिट्टी खदान १० कि.मी. अंतरावर असल्याचे अंदाजपत्रकात दाखवून आर्थिक अपहार करण्यात आला. मात्र हाकेच्या अंतरावर मिर्झापूर खदान आहे. येथून दगड, गिट्टी घेऊन वाहतूक खर्चाचे देयक अंदाजे ५ लाख रूपयांपर्यंत काढण्यात आले आहे. लघुसिंचन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. जि.प.सदस्य ठाकरे यांनी माहितीच्या अधिकारात वेगवेगळ्या ठिकाणचे अंदाजपत्रक व इतर बाबींची माहिती मागितली. परंतु संबंधित विभागाने टाळाटाळ केल्याने भ्रष्टाचार झाल्याची शंका बळावली होती. पिंपळखुटा परिसरात पाझर तलावाच्या दुरूस्तीकरिता २१ लाख ८९ हजार ९४० रूपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार सदर काम संबंधित शाखा अभियंत्याच्या संमतीने ७.८९ टक्के बिले घेऊन तलाव दुरूस्ती १६ लाख ४७ हजार रूपयांत करण्यात आली. प्रत्यक्षात बरीच कामे बाकी असून केवळ १६ हजार रूपये शिल्लक ठेवून इतर रकमेची उचल संबंधित कंत्राटदार व शाखा अभियंत्याच्या संमतीने केली आहे. याचे बिंग फुटणार म्हणून घाईघाईत ठेकदार आणि अभियंता कुळकर्णी यांनी एकाच दिवशी १९ जून रोजी बाहेरुन मजूर आणि साहित्य आणून भिंत उभारण्याचा प्रताप केला. युवक काँग्रेसच्या सतर्कतेमुळे हा पयत्न फसल्याने काम बंद पडले. याबाबत वरिष्ठांनी दखल घेऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. जिल्हा परिषद बांधकाम सभापती गिरीश कराळे, सदस्य विक्रम ठाकरे आणि भाजपाचे युवा नेते ेविजय श्रीराव यांनी जि.प.अध्यक्ष, मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

लघु सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या नावावर भ्रष्टाचार
तालुक्यात जिल्हा परिषद लघु सिंचन पाटबंधारे विभागामार्फत अनेक पाझर तलावांची कामे सुरुअसून अशाप्रकारे तेथील देयके काढल्याचे बोलले जात आहे. कारली येथील प्रकल्पाचे आसोनासह आदी प्रकल्पाची कामे पूर्ण न होताच निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चोकशी करण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे.

Web Title: Irrigation Department's corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.