डॉक्टरांची राजकारणातही अमिट छाप
By Admin | Updated: July 1, 2015 00:46 IST2015-07-01T00:46:19+5:302015-07-01T00:46:19+5:30
१ जुलै हा डॉक्टर डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

डॉक्टरांची राजकारणातही अमिट छाप
वसंत कुळकर्णी तळेगाव दशासर
१ जुलै हा डॉक्टर डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारतात पूर्वी ज्या डॉक्टरांनी आपले आयुष्य पणाला लावून कार्य केले त्या डॉक्टरांचा डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो.
पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून डॉ. विधानचंद्र रॉय होऊन गेले. ते राजकारणी व सोशल वर्कर्स होते. त्यांचा जन्म ५ जुलै १८८२ रोजी बिहारमध्ये झाला. त्यांनी एमबीबीएस, एफआरसीएस या पदव्या मिळविल्या होत्या. ४ फेब्रुवारी १९६१ रोजी त्यांना भारतरत्न खिताब मिळाला. त्यांनी देशासाठी व जनतेचे सेवेसाठी त्यांचे आयुष्य खर्ची घातले. १ जुलै १९६२ साली त्यांचा मृत्यू झाला. ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांचा १ जुलै रोजी मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ व सेवेप्रित्यर्थ १ जुलै हा दिवस डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो.
डॉक्टर म्हटले की, सेवाभावी व्यक्तिमत्त्व. जनतेला आजारातून जीवदान देणारे परमेश्वरी रुपच म्हणावे लागेल, जो सेवाभावीवृत्तीने जनतेची सेवा करतो तो खरा डॉक्टर. आजच्या काळात मात्र सेवाभावीवृत्ती लोप पावत असून रुग्णसेवा हा एक व्यवसाय बनला आहे. रुग्णाची सेवा ही पैशात रुपांतरित झाली आहे. गरीब रुग्ण मात्र यात भरडले जात आहेत. सुखसोयी उपलब्ध केल्या आहेत. परंतु त्या योजनेची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच औषधांच्या वाढत्या किंमती गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहेत. शासनाने यावर निर्बंध घालणेही गरजेचे आहे. काही डॉक्टर कंपन्यांनी दिलेल्या लालसेपोटी नाहक ग्राहकाला गंडा घालविताना दिसतात. रुग्णांना औषधाविषयी काही एक माहिती नसल्याने तो निमूटपणे डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रीप्शनवरील औषधे आणतो. त्याकरिता डॉक्टरांनी सेवाभावी रुपाने रुग्णांना वाजवी दरात सेवा दिल्यास रुग्णांना मानसिक समाधान लाभेल, डॉक्टरकीचा व्यवसाय न समजता सेवाभावी रूपाने सेवा करावी. एमबीबीएस व एमडीसारख्या तज्ज्ञांनी ग्रामीण भागास सेवा दिल्यास अधिक योग्य होईल.