रक्तदानात पोलिसांचाही सहभाग कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:57+5:302021-07-08T04:10:57+5:30
अमरावती : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. कोरोना संक्रमणकाळात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत असताना ‘लोकमत’ने रक्त संकलनासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी ...

रक्तदानात पोलिसांचाही सहभाग कौतुकास्पद
अमरावती : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. कोरोना संक्रमणकाळात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत असताना ‘लोकमत’ने रक्त संकलनासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. तद्वतच, रक्तदान कार्यात पोलिसांचाही सहभाग कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी काढले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त "लोकमत रक्ताचं नातं" हे अभियान सुरू आहे. यानिमित्त येथील वसंत हॉलमध्ये ‘लोकमत’ व पोलीस आयुक्तालयाच्यावतीने बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यावेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्तद्वय शशीकांत सातव व विक्रम साळी तथा ‘लोकमत’चे संपादकीय प्रमुख गजानन चोपडे उपस्थित होते. यावेळी राजापेठ विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार, पीएसआय विनोद चव्हाण व निवांत जाधव यांनी रक्तदान केले. या शिबिरात एकूण ५४ पोलिसांनी रक्तदान केले. संचालन सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण गवंड यांनी केले.
यांनी केले रक्तदान
ए पॉझिटिव्ह : शेखर गेडाम, प्रवीण राखंडे, वीरेंद्र खेडकर, शंकर खराठे, अजय जाधव, अंकुश कडू, राजेश यादव, लक्ष्मण गावंडे, श्रीरंग राऊत, मोहन घावडे, वीरेंद्रसिंग चव्हाण, आकाश सुसळे, अमित कुढरे, वैशाली सुरजेकर, रुपेश काळे,
बी पॉझिटिव्ह : विनोद चव्हाण, अविनाश नावर, ईश्वर राठोड, विनोद वानखडे, प्रेमराज वानखडे, दत्ता नरवाडे, सयद साबीर, ममता बोध, राजाभाऊ राऊत, रोशन बनसोड, नंदकिशोर घरडे, रेवासिंग जाधव, सुरेखा पवार, पुरोहित मुरखे, आकाश अढाऊ,
एबी पॉझिटिव्ह : जयसिंग जाधव, राजेश ब्राम्हण, मनीष करपे, लता ठाकरे, विशाल वरघट, पूजा सराटे, धीरेंद्र चरपे, विजय गिरी, विजय पवार
ओ पॉझिटिव्ह : भरत गायकवाड, बाबाराव अवचार, सचिन साबळे, स्वप्निल रेऊलकर, अक्षय हांडे, प्रानू भुडले, सौरभ बांगडे, विलास वाळके, चेतन खालीकर, शंकर धनराज, प्रवीण काळे, भगवान गिरी, अंकुश ठाकरे, बालाजी वलसने, सौरभ किरकटे.