शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

‘तपास सुरू आहे !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

पोलीस केवळ बयानांचा खेळ खेळत असल्याची ओरड आता होऊ लागली आहे. डॉ. भट्टड यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, ज्या ठिकाणी डॉक्टरांनी कथितरीत्या आत्महत्या केली, त्या खोलीला दोन दारे आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात तिसरे दारही उघड होऊ शकते, असे काही जणांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ठामपणे सांगितले.

ठळक मुद्देगुंता कायम : पोलिसांच्या तपासावर खिळल्या नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक राजेंद्र भट्टड यांच्या संशयास्पद मृत्यूला पंधरवडा उलटत असताना, त्यांच्या मृत्यूचे गुढ उलगडण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही. डझनभर लोकांची बयाने, सीसीटीव्ही फुटेज आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांचा प्राथमिक निष्कर्ष हाती असताना, डॉ. भट्टड यांच्या मृत्यूची ठोस कारणमीमांसा होऊ शकली नाही. तमाम दर्यापूरकरांच्या नजरा या प्रकरणाकडे खिळल्या असताना पोलिसांकडून येणारे ‘तपास सुरू आहे’ हे पालुपद संशयाला खतपाणी घालणारे ठरले आहे.दर्यापूर पोलिसांच्या कार्यतत्परतेवर विश्वास ठेवून शिवसेना, मनसे व इतर राजकीय, सामाजिक कार्यकर्ते ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत की काय, अशी शंकाही खुलेआम घेतली जात आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी प्रचंड गोपनीयतेचा पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाबाबत कुणालाही विचारले, तर एकच पठडीतील उत्तर दिले जाते, ते म्हणजे - तपास सुरू आहे. मात्र, त्या तपासादरम्यान काही पुरावे हाती लागलेत का, त्यातून डॉ. भट्टड यांचा मृत्यू नेमका गळफास घेतल्याने झाला की कुणी त्यांना गळफास देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला की अन्य काही, या एकाही प्रश्नाचे उत्तर पंधरा दिवसांनंतरही मिळू शकले नाही.पोलीस केवळ बयानांचा खेळ खेळत असल्याची ओरड आता होऊ लागली आहे. डॉ. भट्टड यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, ज्या ठिकाणी डॉक्टरांनी कथितरीत्या आत्महत्या केली, त्या खोलीला दोन दारे आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात तिसरे दारही उघड होऊ शकते, असे काही जणांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ठामपणे सांगितले. तथापि, त्या दिशेने पोलिसांना रोख वळविता आलेला नाही.पोलीस प्रशासन रेस्टहाऊसलगत असलेल्या आयसीयूमध्ये दाखल काही रुग्णांचे बयान घेणार होती. मात्र, त्यालाही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. एकंदरीतच या प्रकरणाचा गुंता सुटण्याऐवजी अधिक गडद झाला आहे. सत्य काय ते तातडीने पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.मेडिकल संचालकाचे बयान के व्हा?डॉ. राजेंद्र भट्टड यांच्या गोदावरी हॉस्पिटलनजीक असलेल्या सुविधा मेडिकलचे संचालक हरीश अंबादास भैय्या यांनी दर्यापूर पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली होती. डॉ. भट्टड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आपणाला एका परिचारिकेने सांगितले. त्यांनी आत्महत्या का केली, हे आपणास ज्ञात नसले तरी त्यांच्या मृत्यूची योग्य ती चौकशी व्हावी, असे त्या तक्रारीत नमूद होते. भट्टड यांच्याकडील एक परिचारिका त्यांना फोनद्वारे आत्महत्येची माहिती देत असेल अन् हरीश भैया तातडीने गोदावरी हॉस्पिटलमध्ये जात असतील, यावरून डॉ. राजेंद्र भट्टड व त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या स्टाफशी त्यांचे अत्यंत आत्मीयतेचे संबंध अधोरेखित होतात. त्यांनी सर्वप्रथम याबाबत तक्रारही नोंदविली. ते या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. मात्र, दर्यापूर पोलिसांनी त्यांचे बयान नोंदविलेले नाही.

टॅग्स :Deathमृत्यू