शिराळ्यातील पंधराव्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:47+5:302021-06-02T04:11:47+5:30
टाकरखेडा संभू : अमरावती तालुक्यातील शिराळा येथे पंधराव्या वित्त आयोगातून झालेली कामे ही नियम डावलून करण्यात आल्याचा आरोप गावातील ...

शिराळ्यातील पंधराव्या वित्त आयोगाच्या कामांची चौकशी करा
टाकरखेडा संभू : अमरावती तालुक्यातील शिराळा येथे पंधराव्या वित्त आयोगातून झालेली कामे ही नियम डावलून करण्यात आल्याचा आरोप गावातील सामाजिक कार्यकर्ते संजय लव्हाळे यांनी केला. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तक्रार दिली. याप्रकरणी त्यांनी चौकशीची मागणी केली आहे,
शिराळा येथे ग्रामपंचायत निवडणुकीपश्चात नवीन कार्यकारिणीने पंधराव्या वित्त आयोगामधून सन २०२०-२१ मधील विविध कामांकरिता निधी मंजूर केला. निविदा प्रक्रिया राबविण्याचा ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेतला तरी ती टाळून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ती कामे पूर्ण देखील केलेली आहेत. यामध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप संजय लव्हाळे यांनी केला आहे. नियम डावलून ही कामे करण्यात आल्याने चौकशी व्हावी, अशी तक्रार त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत ंपंडा यांच्याकडे दिली.
ग्रामपंचायतीमध्ये २७ मे रोजी कामे सुरू करण्याबाबतचा ठराव घेण्यात आला. परंतु, त्यापूर्वीच यातील काही कामे पूर्ण करण्यात आल्याचा आरोप संजय लव्हाळे यांनी तक्रारीतून केला आहे.