सत्यपाल महाराजांवरील हल्ल्याची चौकशी करा
By Admin | Updated: May 23, 2017 00:10 IST2017-05-23T00:10:48+5:302017-05-23T00:10:48+5:30
सप्त खंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सोमवारी गुरूदेव सेवा मंडळ व संभाजी बिग्रेडने जिल्हाकचेरीवर तीव्र निषेध केला.

सत्यपाल महाराजांवरील हल्ल्याची चौकशी करा
निवेदन : पोलीस संरक्षण द्या, गुरूदेव प्रेमींची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सप्त खंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सोमवारी गुरूदेव सेवा मंडळ व संभाजी बिग्रेडने जिल्हाकचेरीवर तीव्र निषेध केला. प्रबोधनकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेता यावर शासनाने उपाययोजना कराव्यात तसेच सत्यपाल महाराजांना पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना सादर निवेदनाव्दारे केली आहे.
सत्यपाल महाराजांवरील हल्ला ही चिंताजनक बाब आहे. सत्यपाल महाराजांच्या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून हुंडाबळी, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा, अनिष्ठरूढी, शैक्षणिक जागूती,स्त्रिभू्रण हत्या, शेती, शेतकरी आत्महत्या,उद्योगता विकास, हागणदारी मुक्ती, तंटामुक्ती सर्वधर्मसमभाव आदी विषयावर योग्य वेळी योग्य प्रबोधनकरून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम प्रबोधनाच्या माध्यमातून केले. निवेदन देतेवेळी रवी मानव,हेमंत टाले, शरद काळे, रणजित तिडके, अजिंक्य काळे, शुभम शेरेकर, विनायक कांडलकर, आदीसह गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकरी व संभाजी बिग्रेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रबोधनकारांना बंदुकीचा परवाना द्या
सत्यपाल महाराजांसारखे विज्ञानवादी प्रबोधनकार शिव, शाहू, फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊ न भूमिका मांडणाऱ्या प्रबोधन करणाऱ्या सत्यपाल महाराजांवरील हल्याच्या संभाजी बिग्रेडने तिव्र निषेध केला आहे. अशा हल्याच्या घटना त्वरीत रोखण्यात याव्यात अन्यथा स्वसंरक्षणार्थ प्रबोधनकारांना बंदुकीचा परवाना देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष तुषार देशमुख, प्रेमकुमार बोके, अभय गावंडे, निखिल काटोलकर, स्वप्निल जाधव, पवन दंवडे, हेमंत टाले यांनी केली आहे.