अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या मुलाखती आटोपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:49+5:302021-09-09T04:17:49+5:30
(कॉमन) अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आठव्या कुलगुरुपदासाठी राजभवनात बुधवारी मुलाखती आटोपल्या आहेत. मात्र, नवे कुलगुरू कोण, हे ...

अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या मुलाखती आटोपल्या
(कॉमन)
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आठव्या कुलगुरुपदासाठी राजभवनात बुधवारी मुलाखती आटोपल्या आहेत. मात्र, नवे कुलगुरू कोण, हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गुरुवारी नाव घोषित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कुुलगुरू निवड समितीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे कुलगुरुपदासाठी पात्र पाच नावे पाठविण्यात आली होती. त्यानुसार डॉ. दीपक धोटे (अमरावती), डॉ. उमेश कदम (दिल्ली), डॉ. कारभारी काळे (औरंगाबाद), डॉ. दिलीप मालखेडे (दिल्ली), डॉ. नंदकिशोर ठाकरे (मानोरा, जि. वाशिम) या पाच जणांच्या राज्यपालांनी मुलाखती घेतल्या आहेत. डॉ. दिलीप मालखेडे आणि डॉ. दीपक धोटे यांच्यात कुलगुरुपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरूंच्या नावांची घोषणा करताना थोडा विलंब लागत असल्याचे वास्तव आहे.